Nitesh Rane
Nitesh Rane esakal
नाशिक

Nitesh Rane News : आमचे लक्ष आता मुंबईकडे ! आमदार नीतेश राणे यांचे सूतोवाच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईतील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे आणि अनधिकृत व्यवसायांचे पेव फुटलेले आहे. अनेक ठिकाणी तर सरकारी जमिनींवर अतिक्रमण होते, हे कुठेतरी रोखावे लागेल. अनेक अवैध व्यवसायांना खुलेआमपणे सवलत दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या व्यवसायांची संख्या मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी भागात सर्वाधिक आहे. यावर आता वेळीच प्रतिबंध घातला नाही, तर भविष्यात हिंदू परिवारांमधील पुढची पिढी ही हिंदू समाजालाच दोष देत राहील, त्यामुळे आमचे पूर्ण लक्ष आता मुंबईवर असल्याचे सूतोवाच आमदार नीतेश राणे यांनी केले. (Our focus now on Mumbai statement of MLA Nitesh Rane maharashtra politics nashik)

हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये आले होते. ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आज ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

श्री. राणे म्हणाले, की हे कायद्याचे राज्य आहे; तर कायद्याचा धाक फक्त हिंदू समाजाला का? शासनाचे नियम पाळणे केवळ हिंदू समाजाचे काम नाही. मुस्लिम असो वा अन्य कुणीही... धर्माचे, नागरिकत्वाचे त्यांनी किमान नियम पाळायला हवेत.

दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. मालेगावमधील वीजचोरीच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केले. ‘जर तुम्ही या देशाला, समाजाला, राज्याला आपले मानता, मग वर्षभरात ३२० कोटींची वीजचोरी कशी करू शकता? एवढे धाडस करणे म्हणजे ही देशाबरोबर गद्दारी करण्यासारखेच आहे.

अवैध धंद्यांना पाठबळ विशिष्ट समाजातूनच सर्वाधिक का मिळते? याचा विचार कुठेतरी होणे गरजेचे आहे. तुम्ही संविधान पाळत असाल तर नियमाप्रमाणे वागायलाच हवे.

जर अशा व्यक्तींना, समाजाला अभय दिले तर जे प्रामाणिकपणे सर्व कर भरतात, सर्व बिले भरतात, त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे. या गोष्टी आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT