oxygen cylinder
oxygen cylinder esakal
नाशिक

ऑक्सिजनअभावी प्राण तळमळला! पिंपळगाव शहरात नातेवाइकांमध्ये धाकधूक

एस. डी. आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या दररोज येणाऱ्या मृत्यूची संख्या काळजाची धडधड व काळजी वाढविणारी आहे. मृत्यूचे हे तांडव सुरू असताना रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी रुग्णांचा प्राण तळमळला आहे. शुक्रवारीही शहरात चार रुग्णांचे श्‍वास थांबले. ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांनी प्राण सोडले. पिंपळगावमधील पुरवठा अनियमित झाल्याने ऑक्सिजन लेव्हल घटली आहे. त्यामुळे नातलगांमध्ये धाकधूक वाढली आहे.

पिंपळगाव शहरात सुमारे ३०० बेड खासगी, तर शासकीय शंभर खाटा अशा एकूण ४०० बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे. सध्या हे सर्व बेड फुल आहेत. रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरलेले असताना ऑक्सिजनचा पुरवठा मात्र घटला आहे. सुमारे ५०० सिलिंडरची गरज असताना अवघ्या २०० ते २५० सिलिंडरचा पुरवठा होत आहे. साधारण एक सिलिंडर सात सीयूएमचे असते. हा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी आहे. रेमडेसिव्हिरचा पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसताना आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण, नातलग व कोविड सेंटरचालक ऑक्सिजनवर आहेत. शुक्रवारी शहरातील तिघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. रुग्णांवर उपचाराऐवजी ऑक्सिजन मिळविण्यातच डॉक्टरांची एनर्जी खर्ची होऊ लागली आहे. नाशिक येथून पुरवठा करणारी कंपनी पिंपळगाव शहराची ऑक्सिजनची गरज भागविते. अचानक मागणी वाढल्याने हा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

पिंपळगाव शहर व परिसरात कोरोनाचा जोरदार फैलाव होत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा झोकून देऊन काम करीत आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचे नाव घेत नसल्याने शासकीय व खासगी रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना ठरावा अशी स्थिती आहे. रेमडेसिव्हिर, प्लाझ्मापाठोपाठ आता रुग्णांना वरदान ठरणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे.

डॉक्टरांची आमदार बनकरांकडे धाव

पिंपळगाव शहरात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी डॉ. उमेश आहेर, अश्‍विन मोरे, रोहन मोरे, अरुण गचाले, मनोज बर्डे, चेतन काळे हे देवदूतांची भूमिका निभावत आहेत. रात्रीचा दिवस करून रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावत आहेत. गरीब रुग्णांविषयी आपुलकी दाखवत बिलाची रक्कम कमी करून सामाजिक दायित्व निभावत आहेत. पण, हे देवदूत सध्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या समस्येने त्रस्त आहेत. संयम संपलेल्या डॉक्टरांनी थेट आमदार दिलीप बनकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आम्ही रुग्णसेवेला तयार आहोत, फक्त पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करा, अशी मागणी त्यांनी आमदार बनकर यांच्यापुढे ठेवली. आमदार बनकर यांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला व थेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कोविड आपत्ती व्यवस्थापन अधिकारी लीना बनसोड व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देण्याबाबत आग्रह धरला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर उपस्थित होते.

पिंपळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग भयावह रूप धारण करत आहे. त्यात डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी जिवाची बाजी लावून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पिंपळगाव शहरासह निफाड तालुक्याला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिव्हिरचा पुरेसा साठा मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून, पुरवठ्यात सुधारणा होत आहे.

-दिलीप बनकर, आमदार, निफाड

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू बघताना आमच्याही हृदयाला चटका बसतो. ऑक्सिजन मिळविताना आमची दमछाक होत आहे. त्याचा पुरवठा अर्ध्यावर आल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आमदार बनकर यांच्याकडे ती कैफियत मांडली आहे.

-डॉ. अरुण गचाले, संचालक, सिद्धिविनायक हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT