jitendra bhave esakal
नाशिक

जितेंद्र भावे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

कॉलेज रोड मार्गावरील डॉ. विक्रांत विनोद विजन (वय ३७, पाटील लेन) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक : खासगी रुग्णालयातील आर्थिक पिळवणूकीविरोधात ऑपरेशन हॉस्पीटल मोहीम राबवित आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (police case has been registered against jitendra bhave for protesting at a private hospital)

कॉलेज रोड मार्गावरील डॉ. विक्रांत विनोद विजन (वय ३७, पाटील लेन) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. विजय यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कोवीड रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्ण दत्तात्रय पांडूरंग आटवणे यांचे निधन झाले. त्यानंतर मृत आटवणे यांचा मुलगा स्वप्नील व मुलगी सायली यांनी शनिवारी (ता.२२) विजन हॉस्पीटलमध्ये रुग्णालयात जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे आदीसोबत येउन हॉस्पीटलने रुग्णांचे जादा बिल आकारल्याची तक्रार करीत, उपचाराचे मूळ कागदपत्र मागून रुग्णालयातील प्रशासनाला वेठीस धरले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दादागिरी करीत, कामात अडथळा आणला तसेच वैद्यकिय व रक्त तपासणी खर्चाची बिल घेउन बाकी पैसे न भरताच निघून गेले. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय संस्‍था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी अधिनियमार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला.

(police case has been registered against jitendra bhave for protesting at a private hospital)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT