esakal | जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra bhave

जितेंद्र भावे यांचे अर्धनग्न आंदोलन : महापालिका करणार चौकशी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : नागरिकांनी भावे (jitendra bhave agitation) यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी भावे यांचे आंदोलन कायदेशीर मार्गाने होते का? याची चाचपणी महापालिकेकडून होणार आहे. महापालिकेने (nashik muncipal corporation) लेखापरीक्षक नेमले आहेत. लेखापरीक्षकाकडे रीतसर अर्ज भावे यांनी केला होता का, याची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णालय दोषी आढळल्यावरही कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (Jitendra Bhave half-naked agitation Municipal Corporation will investigate)

महापालिका करणार चौकशी

रुग्णालयांमध्ये महापालिकेने लेखापरीक्षकांची नियुक्ती केली असल्याने संपूर्ण घटनेमध्ये महापालिकेचादेखील संबंध येत असल्याने महापालिकेने त्यांच्यापरीने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाकडे बिले तपासणीचा अर्ज केला होता का, अर्ज न करताच आंदोलन केले का, या सर्व प्रकरणाची मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलन करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब झाला नसेल तर त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. आंदोलन प्रकरणातील दोन्ही बाजू तपासणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: 'कपडे काढो' आंदोलनावर आपचे जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया;व्हिडिओ

हेही वाचा: लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावे