The flowing Saraswati Nala esakal
नाशिक

दहिपूल परिसराची समस्या कायम; सरस्वती नाल्यावर गेट बसविण्याच्या काम अपुर्ण

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दहिपूल सराफ बाजार परिसरात जोरदार पाऊस होताच परिसराला नदीचे स्वरूप येणे नित्याचे झाले आहे. यंदादेखील तशी परिस्थिती निर्माण होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त रमेश पवार असताना काही दिवसापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यांनी पाहणी दौरा करत सरस्वती नाल्यावर गेट बसविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यातून काही अंशी पाणी साठण्याच्या समस्येवर प्रतिबंध लागण्याची शक्यता होती. परंतु, त्यावर अद्याप काही उपाययोजना करण्यात आल्या नाही. गेट बसवण्याचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येत आहे. (problem of Dahipool area remains work of installing gates on Saraswati Nala is incomplete nashik Latest Marathi News)

शहरात मुसळधार किंवा जोरदार पाऊस झाला, की विविध भागातील पावसाचे पाणी वाहत दहिपूल, सराफ बाजारच्या दिशेने येत असते. शहरातील सर्वात जुना नाला असलेला सरस्वती नाल्यात पाणी न जाता नाल्याच्या जाळ्यांवरील कचऱ्यामुळे पाणी आडून बाहेरच साठत असते.

शिवाय गोदावरी अतिरिक्त पूर आल्यास पुराचे आणि नाल्याचे पाणी सराफ बाजारात शिरून नदीचे स्वरूप येऊन व्यावसायिकांचे नुकसान होत असते. दरवर्षी अशी समस्या निर्माण होते. काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तत्कालीन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सराफ बाजाराचा पाहणी दौरा केला. अशी समस्या निर्माण होण्याचे कारण जाणून घेतले. परिसरातील नागरिक, व्यावसायिकांशी चर्चा केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नाल्याचे पाणी पुन्हा माघारी येणार नाही.

यासाठी नाल्यावर गेट बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांची बदली झाल्याने गेट बसविण्याच्या कामास जणू रेड सिग्नल मिळाला आहे. इतके दिवस उलटूनही अद्याप त्यावर कुठली कारवाई झालेली नाही. कुठेतरी गेट बसविण्याच्या कामाचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सराफ बाजार, दहिपूल परिसराची समस्या मात्र कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT