Breast Cancer Survivor News
Breast Cancer Survivor News esakal
नाशिक

Project Durga : शंकांचे समाधान होईपर्यंत रीना कुमारी यांनी केला पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

प्रारंभी स्‍तनात छोटीशी गाठ आढळल्‍यानंतर वैद्यकीय चाचण्या केल्या. वारंवार तपासण्या करूनही काहीही निदान होत नव्‍हते. दरम्‍यानच्‍या काळात कोरोना लागण झाली व यशस्‍वी मातदेखील केली. उत्तरीय चाचण्यांमध्ये कर्करोगाचे निदान झाले. खंबीरपणे प्रसंगाला तोंड देताना रीना कुमारी व त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी कर्करोगाचा पराभव केला. जागृकतेमुळे वेळीच निदान करण्यासह प्रभावी उपचार करणे शक्‍य झाले.

जुलै २०२० मध्ये रीना कुमारी यांना स्‍तनात गाठ जाणवल्‍याने नाशिक रोड येथे डॉक्‍टरांकडे तपासणी केली. विविध चाचण्या केल्‍यानंतर सर्व बाबी सामान्‍य असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तरीदेखील मनात काहीशी भीती असल्‍याने, त्‍यांनी स्‍त्रीरोग तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली आणखी काही तपासण्या केल्‍या. (Project Durga Reena Kumari beat cancer on time Nashik Latest Marathi News)

सर्व रिपोर्ट सामान्‍य आल्‍याने त्‍यांच्‍यासह कुटुंबीय निर्धास्‍त झाले. या दरम्‍यान एप्रिल २०२१ मध्ये त्‍यांना कोरोना लागण झाली. या वेळी एचआरसीटी चाचणीत पुन्‍हा गाठ आढळून आल्‍याने, हुरहूर सुरू झाली. कोरोनावर तर यशस्‍वी मात केली, परंतु गाठ कसली आहे, याची खात्री करून घेण्याचे निश्‍चित केले. बायोप्सी केल्‍यानंतर स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान झाले. अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबीयांना रुग्‍णालयात भर एसीमध्ये घाम फुटायला सुरवात झाली. परंतु, रीना कुमारी यांनी सुरवातीपासून सकारात्‍मक दृष्टिकोन ठेवला.

आजाराचा स्‍वीकार करताना आपल्‍या मुलगा व मुलीसाठी कर्करोगाचा पराभव करायचा दृढ निश्‍चय त्‍यांनी केला. कर्करोग तज्‍ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांच्‍याकडे ॲपेक्‍स हॉस्‍पिटल येथे उपचाराला सुरवात केली. त्‍यांनी केलेल्‍या समुपदेशनामुळे रीना कुमारी यांच्‍यासह कुटुंबीयांची भीती दूर झाली. काहीसे तणावपूर्ण वातावरण निवळताना सर्वांनी एकत्रितपणे आजाराचा पराभव करण्याचे ठरविले.

पती अशोक कुमार रेल्‍वे विभागात नोकरीस असल्‍याने डॉक्‍टरांच्‍या सल्ल्याने मुंबईतील टाटा हॉस्‍पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली. ॲपेक्‍स हॉस्‍पिटलमध्ये आठ केमो सायकल घेताना श्रीमती कुमारी यांनी कर्करोगावर यशस्‍वी मात केली. शंकेचे समाधान होईपर्यंत तपासणी करून घेतली व त्यामुळे वेळीच निदान झाल्‍यामुळे कर्करोगाला वेळीच अटकाव करण्यात यश आले असल्‍याचे त्‍या सांगतात. प्रत्‍येक महिलेने आपल्‍या आरोग्‍याविषयी जागृत राहिले पाहिजे, असा सल्‍ला त्‍या देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT