Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील 32 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ३२ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थपना देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ३२ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थपना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली.

यामध्ये आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) व आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. (Promotion of 32 health workers in Zilla Parishad nashik zp news )

जिल्हा परिषद अंतर्गत वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या पदोन्नती प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आल्या आहेत इतर सर्व विभागांनी सुद्धा आपल्या विभागातील पदोन्नती प्रक्रिया ही तत्काळ पूर्ण करावी अशा सूचना यावेळी मित्तल यांनी दिल्या.

गत महिन्यात आरोग्य कर्मचारी पदोन्नतीसंदर्भात मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी पदोन्नती प्रस्तावांची पडताळणी केली.

मंगळवारी (ता.९) आरोग्य सहाय्यक पदावरून आरोग्य पर्यवेक्षक पदावर ३, आरोग्य सेवक मधून आरोग्य सहाय्यक २३ तर आरोग्य सेविका पदावरून आरोग्य सहाय्यक (महिला) ६ अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांना समुपदेशनातुन पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली.

पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशानातुन पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यामुळे पदोन्नती मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मित्तल , उपमुख्यकार्यकारी अधिकारी परदेशी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT