Mobiles seized during raids at Matka gambling den at Ambedkarnagar in Chunchale Shiwar
Mobiles seized during raids at Matka gambling den at Ambedkarnagar in Chunchale Shiwar esakal
नाशिक

Nashik Crime : चुंचाळे शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबडच्या चुंचाळे शिवारातील दत्तनगरमध्ये चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने छापा टाकला.

यावेळी पथकाने रोकड, मोबाईल व दुचाक्या असा ४ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. (Raid on gambling den in Chunchale Shivar Nashik Crime)

शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाचे अंमलदार भगवान जाधव यांना चुंचाळे शिवारात मटका जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय खबर मिळाली होती.

याबाबत पथकाचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना माहिती दिल्यानंतर विशेष पथकाने चुंचाळे शिवारातील आंबेडकर नगरमधील संदीप पानपाटील यांच्या चाळीच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी पथकाने मटका जुगार खेळविणारा संशयित शाम हरिभाऊ वाघमारे (५०, रा. साईबाबा नगर, राजरत्ननगर, मोरवाडी, सिडको) याच्यासह मटका जुगार खेळणाऱ्या २१ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

घटनास्थळावरून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी असा ४ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पथकाचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहायक निरीक्षक प्रविण सूर्यवंशी, हेमंत नागरे, किरण रोंदळ, हेमंत फड, उपनिरीक्षक दिलीप भोई, रंजन बेंडाळे, किशोर रोकडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, गणेश वडजे, प्रवीण चव्हाण यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT