An episode from the play 'Apulachi Vada Maasani'. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: स्वतःचा शोध घेणारा 'आपुलाची वाद आपणासी'

सकाळ वृत्तसेवा

देवाचा शोध घ्यायचा असेल तर आधी स्वतःचा शोध घेतला पाहिजे हा भावार्थ सांगणारी नाट्यकृती 'आपुलाची वाद आपणासी'.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी (ता. १०) मायको एम्प्लॉईज फोरम या संस्थेतर्फे सादर झाले. समीर मोने लिखित या नाटकाचे सचिन रहाणे यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Self Discovery Apulachi Vada Paasani nashik)

वारकरी संप्रदाय ज्यांना जगद्गुरु मानतो त्या संत तुकारामांच्या प्रापंचिक जीवनातील क्षणांचा परिचय या नाट्यकृतीतून प्रेक्षकांसमोर उभा राहिला.

चिरंतनाचा शाश्वत शोध घेण्यासाठी संत तुकाराम घरातून बाहेर निघून जात आणि दुसरीकडे कुटुंबात त्यांच्या अनुपस्थितीमुळे उद्भवणारे कलह प्रसंगानुरुप उभे राहिले. आई- वडील सोडून गेले. भाऊ विरक्तीने तिर्थाटनाला जातो.

विठ्ठलाच्या भेटीला विकुंठ प्राप्तीसाठी तुकाराम घरातून निघून जातात अन् त्यांना शोधण्याचा प्रयत्न भाऊ कान्होबा करत असतो.

तेव्हा विठ्ठल कान्होबाला दर्शन देऊन सांगतात वैकुंठाच्या वाटेने निघालेल्या तुकारामाला शोधायचे असेल तर तुला आधी विठ्ठलाला शोधावे लागेल अन् विठ्ठलाला शोधायचे असेल तर आधी स्वतःचा शोध घ्यावा लागेल.

मानवी आयुष्यात मरण टाळण्यासाठी देव शोधू लागतात, अनेक मार्ग अवलंबतात मात्र भय आत्मसात करतात. तरीही मरणाला कवटाळले जाते हे कोणालाच चुकत नाही. जीवनातील हाच संघर्ष अर्थात 'आपुलाची वाद आपणासी' या नाट्यकृतीतून चिंतन करायला लावतो.

विषयाच्या मांडणीसाठी दिग्दर्शकाची मेहनत कलावंत आपल्या अभिनयातून फळाला नेत होते. नेपथ्य पुरक होते. प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत काही तांत्रिक आणि क्षणिक बाबी सोडल्यास प्रसंगी उत्तम साकारले.

प्रणील तिवडे, सोनल उमा सुरेश, जय शुक्ल, केतकी कुलकर्णी, विजय घुमरे. श्रुतिका घुले- गाडे, सम्राट सैंदानकर, शब्दजा वेलदोडे- देशपांडे, स्वरुप बागूल, नीलेश सोनार, स्वप्नील वानखेडे, सनी धात्रक, दिगेन वाघ, सुरज बोरसे, राधा चव्हाण या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

नेपथ्य दीपक चव्हाण, विनय कटारे यांनी साकारले. विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना तर सचिन रहाणे यांनी पार्श्वसंगीत दिले. ललित कुलकर्णी यांनी रंगभूषा तर मोहिनी सरोदे, भावना कुलकर्णी यांनी पात्रांच्या वेशभूषा साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT