Rape crime news esakal
नाशिक

Nashik Crime Update : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार; गुन्हा दाखल

नरेश हाळणोर

नाशिक : महाविद्यालयातील ओळखीतून जुळलेल्या प्रेमाचा फायदा घेत गोविंदनगर परिसरातील संशयिताने पालकांसोबत ओळख करुन देण्याचा बहाणा करून घरी नेले आणि बळजबरीने बलात्कार केला. तसेच, त्यानंतरही वारंवार गावठी कट्ट्याचा धाक दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

विशेषत: संशयिताने पीडितेला एमडी ड्रग व गावठी कट्टे जवळ बाळण्यास सांगितले असता, तिने नकार देताच तिला जातीवाचक शिवीगाळ करुन धमकवले. त्याप्रकरणी अंबड पोलिसात संशयिताविरोधात बलात्कार, आर्म अँक्ट, अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी अरुण निहाळदे (28, रा. पवननगर, सिडको, हल्ली रा. गोविंदनगर) असे संशयिताच नाव आहे. २६ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती पंचवटीतील एका महाविद्यालयात असताना तिची ओळख निहाळदेशी झाली. त्याने सन 2018 पासून 20 आॅक्टाेबर 2022 पर्यंत तिला स्वत:च्या पालकांबरोबर तिची ओळख करून देतो असे सांगून पवननगर येथील घरी बोलावुन घेतले.

तेथे त्याने घरी कुणीही नसल्याची संधी साधत लैंगिक अत्याचार केला. हे जर कुणाला सांगितले तर तुला व घरातील लोकांना ठार मारील अशी धमकी दिली. यासह याच कालावधीत स्कॉडा कारमध्ये (एमएच 48 पी 1536) बसवून पाथर्डी फाटा येथील सेवन हेवन हॉटेल, हॉटेल पंचवटी एक्सप्रेस, हॉटेल एक्सिलेन्सी येथे नेत अत्याचार केले.

दरम्यान, सनी याने आपल्याकडील दोन पैकी एक गावठी कट्टा व एमडी ड्रग तुझ्या घरी ठेव, जेव्हा लागेल मला तेव्हा दे, असे म्हणत तिला धमकावले. तिने कट्टे जवळ ठेवण्यास नकार देताच त्याचा राग आल्याने सनीने तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच, पीडितेला फोनवरुन धमकावत त्याने अश्लिल बोलून महापुरुषांचा अवमान केल्याचा व्हिडीआदेखिल पोलिसांना सादर करण्यात आला आहे. याबाबत सहायक आयुक्त सोहेल शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT