civil-hospital.jpg 
नाशिक

''ते'ही शेवटी माणसेचं न?...त्यांचे आरोग्यही महत्वाचे''...अन् लढविली अशी शक्कल

नरेश हळनोर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील चारमजली सिंहस्थ इमारतीत कोरोना विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात तीन शिफ्टमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या अधिसेविका, परिचारिक आणि वॉर्डबॉय यांच्या आठवडाभराची निवास व भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आठवड्यानंतर त्यांची आरोग्य चाचणी होऊन, त्यात त्यांना काही लक्षणे आढळली तर तत्काळ त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविले जाणार आहेत. आठवडाभरा च्या कर्तव्यानंतर त्यांना पुढचे सात दिवस घरातच क्वारंटाइन करून घेणे बंधनकारक केले आहे. जिल्हा रुग्णालयाने कक्षातील कर्मचाऱ्यांसाठीची ही खबरदारीची उपाय योजना केली असून, खऱ्या अर्थाने ते रिअल कोरोना फायटर्स आहेत. 

नवीन सिंहस्थ इमारतीत विशेष कोरोना कक्ष

नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील चारमजली नवीन सिंहस्थ इमारतीत विशेष कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर आलेल्या रुग्णांची ओपीडी नोंद केली जाते. पहिल्या मजल्यावर फिजिशियन डॉक्‍टरांचा तपासणी कक्ष व मेडिकल स्टोअर आहे. दुसऱ्या मजल्यावर कोरोनासदृश लक्षणे असलेले रुग्ण, तिसऱ्या मजल्यावर कोरोना संशयित रुग्ण, चौथ्या मजल्यावर कोरोनाबाधितांचा कक्ष आहे. अधिसेविका, परिचारिक आणि वॉर्डबॉय (चतुर्थश्रेणी कर्मचारी) असे एका वॉर्डसाठी चार कर्मचारी याप्रमाणे, सुमारे 35 ते 40 कर्तव्यावरील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कक्षात आहेत. त्यांच्या निवासाची सोय जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात केली आहे. 

फिजिशियनमार्फत तपासणी

कोरोना इमारतीत येताना सॅनिटाइझ करून, पीपीई किटचा वापर बंधनकारक आहे. शिफ्ट संपल्यानंतर पुन्हा सॅनिटाइइ होऊन बाहेर पडायचे. खोलीवर गेल्यानंतर त्या ठिकाणीच त्यांची निवासाची व भोजनाची सोय आहे. आठवड्याची शिफ्ट केल्यानंतर त्यांची फिजिशियनमार्फत तपासणी होते. यात त्यांना काही लक्षणे आढळल्यास स्वॅब घेतले जाणार आहे. रुग्णालयात अहवाल येईपर्यंत क्वारंटाइन केले जाणार आहे. घरी गेल्यानंतर त्यांना सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. पुढच्या शिफ्टमध्ये येणाऱ्यांनाही याच खबरदारीच्या उपाययोजना आहेत. 

डॉक्‍टरांसाठीही निवासव्यवस्था
 
कोरोना कक्षातील अधिसेविका, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्याप्रमाणेच डॉक्‍टरांसाठीही निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने सेवा देणारे डॉक्‍टर दक्षता घेत आहेत; परंतु रुग्णसंख्या वाढल्यास डॉक्‍टरांनाही आठवड्यासाठी घरी न जाता शासकीय विश्रामगृह वा हॉटेलमध्ये निवास, भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. 

कोरोना कक्षात काम करणारे डॉक्‍टर व कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही दक्षता घेणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने शिफ्टनिहाय सेवा देणाऱ्यांना आठवडाभर निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. आठवड्यानंतरही त्यांनी घरात सात दिवस क्वारंटाइनच राहणे बंधनकारक केले आहे. - डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT