esakal | VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!
sakal

बोलून बातमी शोधा

vishwas-nangare-patil.jpg

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता सर्व स्तरातून प्रयत्न होताना दिसत आहेत. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, लोकप्रतिनिधी, चित्रपट कलाकार, सामाजिक संस्था यांचा सहभाग बघायला मिळतो. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे लाखो नागरिकांचे व तरुणांचे आयडॉल आहेत. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोक आतुर असतात. हाच धागा पकडून त्यांचा सामाजिक संदेश देणारा एक छोटासा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : आपण आतापर्यंत सीपी साहेबांनी एसीपी साहेबांना आदेशित केल्याचे ऐकले असेल. परंतु नाशिकमध्ये दोन एसीपींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपी ( विश्वास नांगरे पाटील ) आदेशित केल्याचे बघून तुम्ही थक्क व्हाल !....एवढेच नव्हे तर त्या एसपींच्या च्या आदेशाचे पालनही सीपी साहेबांना करावे लागल्याचे तुम्हाला केवळ ऐकायलाच नव्हे तर बघायला देखील मिळेल....

व्हायरल व्हिडिओ
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता सर्व स्तरातून प्रयत्न होताना दिसत आहेत. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, लोकप्रतिनिधी, चित्रपट कलाकार, सामाजिक संस्था यांचा सहभाग बघायला मिळतो. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे लाखो नागरिकांचे व तरुणांचे आयडॉल आहेत. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोक आतुर असतात. हाच धागा पकडून त्यांचा सामाजिक संदेश देणारा एक छोटासा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांची दोन लहान मुले जान्हवी व रणवीर हे एसीपी म्हणजे "एॅंटी करोना पोलीस" च्या भूमिकेत दिसून येत आहे.

यामध्ये मुलं व पप्पा मधील संवाद पुढीलप्रमाणे... "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण आम्ही या घरातले एसीपी आहोत." ' त्यामुळे तुम्ही घरात येण्यापूर्वी शूज काढा, फोन सनीटायझरने स्वच्छ करा... हात धुऊन घ्या... नंतर बाथरूम मध्ये जा' असा आदेश ते ( पप्पा ) विश्वास नांगरे पाटील यांना देत असल्याचा व्हिडिओ बघायला मिळतो. शेवटी नागरे पाटील यांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सुरू केलेली एंटी कोरोना पोलीसच्या मुव्हमेंटचे स्वागत केले असून याप्रमाणे सर्वांनी त्याचे अनुकरण करावे असे आवाहन केल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सध्या तो नागरिकांना महत्त्वाचा संदेश देणारा ठरत आहे.


हेही वाचा > मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह.. २४ तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर...

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

go to top