esakal | संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अँम्ब्युलन्स चालकाच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार..चालकाला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance corona.jpg

इश्तीयाक अहमद असे अँम्ब्युलन्स चालकाचे नाव असून रूग्णाचा हट्ट कायम राहिल्याने कोरोना बाधित रूग्णाची अखेर क्वारंटाईन रूग्ण असलेल्या मन्सुरा युनानी महाविद्यालयात याठिकाणी रवानगी करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर मनपा प्रशासनाकडून पोलिस प्रशासनाला दोन्हीही रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मागणी करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे जीव धोक्यात घालून सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोधर्याचे खच्चीकरण होत आहे हे मात्र नक्की!

संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अँम्ब्युलन्स चालकाच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार..चालकाला मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : मालेगाव या ठिकाणी कोरोनाबाधित रूग्णाची रूग्णवाहिका चालकाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तसेच यावरच न थांबता त्या रुग्णाने रूग्णवाहिका चालकाच्या अंगावर थुंकल्याचा प्रकारही घडला आहे.

असा घडला प्रकार

बुधवारी (ता.१५) कोरोनाबाधीत रुग्णाला मालेगावातील जीवन हॉस्पीटलऐवजी मन्सुराला दाखल व्हायचे होते. आणि याच हट्टातून हा प्रकार घडल्याचे समजते. इश्तीयाक अहमद असे अँम्ब्युलन्स चालकाचे नाव असून रूग्णाचा हट्ट कायम राहिल्याने कोरोना बाधित रूग्णाची अखेर क्वारंटाईन रूग्ण असलेल्या मन्सुरा युनानी महाविद्यालयात याठिकाणी रवानगी करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर मनपा प्रशासनाकडून पोलिस प्रशासनाला दोन्हीही रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मागणी करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे जीव धोक्यात घालून सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोधर्याचे खच्चीकरण होत आहे हे मात्र नक्की!

बुधवारी मालेगावात आणखी 4 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

दरम्यान बुधवारी (ता.१५) मालेगावात आणखी 4 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अत्यंत चिंताजनक बाब आहे. याआधी आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. बुधवारी आढळलेल्या 4 कोरोनाबाधितांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासात मालेगावात 9 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून मालेगावातील कोरोनाबांधितांची संख्या 40 वर पोहचली, 40 पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा > कर्जाच्या बोजाखाली 'त्याचा' जीव गुदमरला..अखेर तरुण शेतकऱ्याने शेवटचा निर्णय घेतला

परिस्थितीला तोंड देऊन कोरोनामुक्त मालेगाव करण्याचा संकल्प

आज रुग्णसंख्या 40 वर पोहोचल्यामुळे मालेगावमधील प्रशासनाचे या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी खासगी दवाखाने उपचारासाठी तयार ठेवले आहेत. पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन याठिकाणी ठाण मांडून आहे. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन कोरोनामुक्त मालेगाव करण्याचा संकल्प त्यांच्याकडून केला जात आहे. अजूनही मालेगावच्या काही भागात नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत असून त्यांनाही आवर घालावा लागणार आहे.

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

go to top