Refrigerator compressor burst Damage 3 to 4 lakh rupees in fire dhule
Refrigerator compressor burst Damage 3 to 4 lakh rupees in fire dhule sakal
नाशिक

धुळे : रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर फुटल्याने आग, लाखोंची हानी

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : दीर्घकाळ बंद असलेला रेफ्रिजरेटर सुरू केल्यानंतर त्याचा कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना 23 मार्चला सायंकाळी सातला शहरातील गणेश कॉलनीत घडली. शोभा धर्मराज शिरसाट असे घरमालकिणीचे नाव असून त्या सुरत येथे मुलाकडे राहतात. त्यांची सर्व मुले बाहेरगावी स्थायिक असून त्यांचे साहित्य तीन खोल्यात ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा नातू ओम शिरसाट शिरपुरात शिक्षणासाठी आला असून तो आजीच्या घरात राहतो. वर्षभरापासून वापरात नसलेला रेफ्रिजरेटर त्याने काही दिवसांपूर्वी उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी सुरू केला.

23 मार्चला सायंकाळी तो घराच्या छतावर असताना रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट होऊन आग लागली. त्यात लाकडी कपाट, पलंग, गाद्या, किचन सेट, धान्य, इलेक्ट्रिक पॅनल, छताचे पंखे, लाकडी मंदीर आदी साहित्य जळून खाक झाले. लोखंडी कपाटातील महत्वाची कागदपत्रे, मुदत ठेव प्रमाणपत्रे, ओम शिरसाटचे महाविद्यालयीन किटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. स्थानिक नगरसेविका संगीता देवरे यांनी सूचित केल्यानंतर पालिकेचे बंब घटनास्थळी पोहचले. त्यांनी तासभर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीत तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची भीती शिरसाट कुटुंबीयांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT