Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  esakal
नाशिक

Sambhajiraje Chhatrapati : ‘त्‍यांना’ महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांसह महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रास देणाऱ्या व संभाजी राजांची हत्‍या केलेल्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण अशोभनीय आहे.

जे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत, त्‍यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्‍दात स्‍वराज्‍य पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खडसावले. (Sambhajiraje Chhatrapati statement about maharashtra politics nashik news)

नाशिक दौऱ्यावर असलेल्‍या संभाजीराजे छत्रपती यांनी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथील कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सध्या राज्‍यातील राजकारणाची पातळी खालावली असल्‍याची टीका त्‍यांनी केली. ते म्‍हणाले, की महाडला जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या समाधीला वंदन केले.

आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांची समाजाला खरी गरज आहे. परंतु या थोर पुरुषांचे आचार-विचार दुर्लक्षित झाल्याची खंत वाटते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छत्रपती शिवाजी महाराजांना ज्‍यांनी त्रास दिला, संभाजी महाराजांची ज्‍याने हत्या केली, महाराणी ताराराणी यांना ज्‍याच्‍याविरोधात संघर्ष करावा लागला, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रातील भूमीत तरी व्‍हायला नको. जर ते होत असेल, तर हा आपला महाराष्ट्र असूच शकत नाही, अशी टीकाही त्‍यांनी केली.

‘वेल ॲन्ड गुड’

भावी मुख्यमंत्री म्‍हणून आपले नाव व छायाचित्र असलेले फलक लावण्यात आल्‍याबाबत विचारले असता संभाजीराजे छत्रपती म्‍हणाले, की कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. याबाबत माझ्या मनात काहीही नसून, केवळ काम करत राहायचे आहे. कार्यकर्ते या कामासाठी ताकद देत असतात. भावी मुख्यमंत्री म्‍हणवत माध्यमांकडूनही महत्त्व दिले जात आहे. याबाबत ‘वेल ॲन्ड गुड’ असे म्‍हणत ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्मात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड; सलग दोन पराभव झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध आज सामना,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT