Santshrestha Nivrittinath Maharaj temple renovation completed in 4 months 70 percent work completed Nashik News
Santshrestha Nivrittinath Maharaj temple renovation completed in 4 months 70 percent work completed Nashik News esakal
नाशिक

Nashik News: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धाराची 4 महिन्यात पूर्णत्वास; 70 टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर : येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी प्रसाद योजनेतून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून जीर्णोद्धाराचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या चार महिन्यात मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे पूर्णत्वास जाणार आहेत.

खासदार हेमंत गोडसे यांनी विकास कामांची आढावा घेत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना केली. (Santshrestha Nivrittinath Maharaj temple renovation completed in 4 months 70 percent work completed Nashik News)

राज्यातील वारकरी संप्रदायामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे विशेष महत्व आहे. या मंदिर आणि परिसरात भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथील विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी श्री. गोडसे यांना घातले होते.

श्री. गोडसे यांनी निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला होता. वर्षभरापूर्वी केंद्र सरकारने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नऊ महिन्यांपूर्वी मंदिर जीर्णोध्दारांतर्गत सभामंडप, दर्शनबारी व ओहरी, भक्त निवास, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. जीर्णोध्दारांतर्गत सुरू असलेल्या सोयी-सुविधांचे काम संथ गतीने सुरू असल्याने त्र्यंबकेश्वरवासियांसह भक्त गणांमध्ये नाराजीचा सूर होता.

पर्यटन विभागाचे अभियंता महेश बागूल, श्री. चांडक, संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे, सचिव ॲड् सोमनाथ घोटेकर, विश्वस्त नारायण मुठाळ, श्रीपाद कुलकर्णी, मनोजकुमार राठी, ह.भ.प. राहुल साळुंके, कांचनताई जगताप, अमर ठोंबरे, भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT