Saptashrungi Devi temple remain close for 45 days latest marathi news
Saptashrungi Devi temple remain close for 45 days latest marathi news esakal
नाशिक

Nashik : सप्तशृंगी गड राहणार महिनाभरासाठी बंद; असा असेल कालावधी

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वंयभू आद्यशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील (Saptashrungi Devi Temple) आदिमाया सप्तशृंगी मातेचे स्वरूप व मुर्ती देखभालीचे कामासाठी आदिमायेचे मंदीर २१ जुन पासून पुढे ४५ दिवस भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत बंद राहणार आहे. याबाबतची अधिकृत माहितीसाठी उद्या ता. १३ रोजी ट्रस्टच्यावतीने पत्रकार परिषदेचे (Press Conference) आयोजन केले आहे. (Saptashrungi temple will remain closed for month Nashik Latest marathi news)

याबाबत मंदिर प्रशासन पत्रकार परिषदेत अधिक माहिती देणार आहे...

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील श्री. भगवती मंदीराचे व्यवस्थापन संस्था श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने सन २०१२-१३ पासून श्री भगवतीचे स्वरूप / मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुष्यंगाने नियोजन सुरु आहे. सध्या कार्यरत असलेले ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी, पवई (बॉम्बे) यासह मे, अजिॆक्यंतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत आदिमायेच्या मुर्तीचे कामासाठी तज्ञांमार्फत मार्गदर्शन प्राप्त करून श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पूर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे.

श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक साठी गुरुवार, दि. २१/०७/२०२२ पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणान्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपुर्वक कार्यरत असणार आहेत. याबाबतची माहीतीसाठी उद्या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती न्यासाचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT