andarsul.jpg 
नाशिक

पेशंटचे ढोंग करुन आलेल्या व्यक्तीकडून कंम्पाउंडरवर हल्ला; परिसरात खळबळ

संतोष घोडेराव

अंदरसुल (नाशिक) : सकाळची वेळ...हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून आलेल्या 'त्या' व्यक्तीने केले धक्कादायक कृत्य. डॉक्टर कुठे आहेत? अशी विचारणा करत कम्पाउंडरने काही सांगायच्या आतच...घटनेने परिसरात एकच खळबळ. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

अंदरसूलला सोमवारी (ता. 9) मेनरोडला डॉक्टर राजे भोसले यांच्या खासगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कामाला असलेले शिवाजी पैठणकर यांच्यावर अचानक अज्ञात हल्लेखोराने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पेशंट म्हणून हा हल्लेखोर रुग्णालयात आला. कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांनी त्याची विचारणा केली. डॉक्टर कुठे आहे? असं या हल्लेखोराने विचारले. मात्र शिवाजी पैठणकर काही बोलण्या आधीच या हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात चाकूने हल्ला करीत जखमी केले. रुग्णालयातून पळ काढत बाहेरचं दार बंद केले. अंदरसुलमध्ये प्रथमच अशी घटना घडल्याने या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस चाकू हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT