शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

अजित देसाई
Friday, 6 November 2020

जनावरांना चारा टाकण्यासाठी ते शेडनेटकडे गेले. शेडनेट फाडून कोणीतरी आत शिरले असल्याचा त्यांना संशय आला. धावतच ते मध्ये गेले तर धक्काच. अंगावर काटा आणणारी घटना. वाचा काय घडले?

नाशिक (सिन्नर) : जनावरांना चारा टाकण्यासाठी ते शेडनेटकडे गेले. शेडनेट फाडून कोणीतरी आत शिरले असल्याचा त्यांना संशय आला. धावतच ते मध्ये गेले तर धक्काच. अंगावर काटा आणणारी घटना. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

बुधवारी (ता. 4) रात्री निमगाव-देवपूर येथे धक्कादायक घटना घडली. नेहमीप्रमाणे प्रभाकर बाळू मुरडनर (वय ३२) हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. शेडनेटचा कागद पंजाच्या सहाय्याने फाडून आत जाण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका त्यांना वाटली. रात्री त्यांनी शेडनेटमध्ये चार शेळ्या बांधल्या होत्या. त्यांना काहीसा संशय आलाच. शेडनेटमध्ये प्रवेश करताच समोर जे दिसले त्यानंतर त्या थरकापच उडाला. बिबट्याने रात्री शेडनेटचा कागद पंजाच्या सहाय्याने फाडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कागद न फाटल्याने त्याने शेडनेटच्या खालच्या भागातून आत प्रवेश केला. तेथे बांधलेल्या दोन शेळ्यांचा शेजारी ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात ओढून नेऊन तेथे त्यांचा फडशा पाडला. तर एक शेळी शेडनेटमध्ये मारून टाकली. 

हेही वाचा > काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

गुरुवारी (ता. 5) सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर मूरडनर यांनी वनविभागास माहिती दिली. या घटनेत त्यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, वनरक्षक वत्सला कांगणे, वनमजूर मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

हेही वाचा > एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attack on goats tied up in a shednet nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: