समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

माळवाडी येथे नेहमीप्रमाणे सकाळी संतोष बागूल शेतात गेले. कांदारोप तयार करण्यासाठी बियाणे टाकले होते. अचानक त्यांना कांदारोप वाळू लागले असल्याचे लक्षात आले. नीट निरखून बघितले असता त्यांनाही धक्काच बसला. वाचा काय घडले नेमके?

देवळा (नाशिक) : माळवाडी येथे नेहमीप्रमाणे सकाळी संतोष बागूल शेतात गेले. कांदारोप तयार करण्यासाठी बियाणे टाकले होते. अचानक त्यांना कांदारोप वाळू लागले असल्याचे लक्षात आले. नीट निरखून बघितले असता त्यांनाही धक्काच बसला. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

गुरुवारी (ता. ५) खाटकी नदीकाठावर संतोष बागूल यांनी आपल्या गट क्रमांक ५८ मध्ये १५ आर क्षेत्रावर आठ पायली (३२ किलोग्रॅम) कांदा बियाणे कांदारोप तयार करण्यासाठी टाकले होते. कांद्याचे रोप वाळू लागल्याने त्यांना जरा संशय आला. निरखून बघितले असता सविस्तर प्रकार लक्षात आला. दोन दिवसांपूर्वी रोपावर कुणीतरी तणनाशकाची फवारणी केल्याने कांदारोपाचे मोठे नुकसान झाले. बागूल यांनी चार हजार रुपये किलोप्रमाणे कांदा बियाणे विकत होते. मशागतीसह दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेमुळे आता कांद्याचे पीक कसे घ्यावे? असा प्रश्न उभा राहिल्याने हे शेतकरी कुटुंब हवालदिल झाला. 

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किसान युवा क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी, ग्रामपंचायत सदस्य निकेश जाधव, ताराचंद बागूल, संतोष बागूल, अभिमन बागूल, संजय बागूल, सूरज आहिरे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malwadi Loss of Rs 1.5 lakh to farmers nashik marathi news