sinnar bazar samiti meeting to be held today for  election of post of Chairman and Deputy Chairman  nashik news
sinnar bazar samiti meeting to be held today for election of post of Chairman and Deputy Chairman nashik news esakal
नाशिक

Sinnar Bazar Samiti : सभापती निवडीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त; संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

अजित देसाई

Nashik News : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे उदय सांगळे यांच्या गटाला समान नऊ जागा मिळल्यानंतर सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी आज होणाऱ्या बैठकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (sinnar bazar samiti meeting to be held today for election of post of Chairman and Deputy Chairman nashik news)

तालुकाबाह्य शक्तींचे पाठबळ या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे -उदय सांगळे यांच्या गटाला मिळाले असून कोकाटे गटाचा एक संचालक गेल्या आठवड्यातच वाजे गटाच्या सानिध्यात आहे. त्यामुळे सिन्नर बाजार समितीत सत्तांतर होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल कडून निवडून आलेला एक संचालक आठवडाभरापूर्वीच वाजेच्या गोठात दाखल झाला आहे.सभापती उपसभापती निवडीच्या अंतिम क्षणी देखील हा सदस्य नॉटरीचेबल राहिल्यामुळे कोकाटे गटाला सत्ता अबाधित राखण्यासाठी चमत्काराची अपेक्षा आहे.

प्राप्त माहितीनुसार कोकाटे गटापासून दुरावलेला संचालक वाजे गटात दाखल झाला असून त्या संचालकाला उपसभापती पद देण्याचा शब्द वाजे गटाकडून देण्यात आल्याचे समजते. समितीच्या या निवडणुकीत आमदार कोकाटे यांना शह देण्यासाठी वाजे गटाला तालुका बाह्य शक्तींकडून देखील पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोपरगाव तालुक्यातील राजकीय शक्तींसोबतच खुद्द नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा देखील प्रत्यक्ष सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली सभापती उपसभापती पदाची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात होईल अशी शक्यता आहे.

या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दोन्ही गटांकडून मोठी गर्दी जमवण्यात आली आहे. कोकाटे गटापासून दुरावलेला तो संचालक विशेष पोलीस बंदोबस्तात निवडणूक स्थळी दाखल होईल. पोलिसांकडून देखील यादरम्यान होणारा संभाव्य राडा टाळण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.

सिन्नर सह एमआयडीसी, वावी व लगतच्या तालुक्यातील पोलिसांची फौज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली असून सोबतीला राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दोन दिवसांपासून सिन्नर बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीचा व त्यादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत होते.

एकूणच बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीकडे तालुका वाशियांसोबतच अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. समान नऊ संचालक निवडून आल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा किचकट होण्याची शक्यता होती. मात्र वाजे गटाने मात करत कोकाटे गटाला शह देण्याची खेळी यशस्वीपणे खेळली असून त्यातून सिन्नर बाजार समितीत सत्तांतर होण्याची चिन्हे आहेत.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच सिन्नर येथील माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे निवासस्थान असलेल्या शिवबा पूर येथे तालुकाभरातील कार्यकर्त्यांची गर्दी जमा होऊ लागली. जोरदार शक्ती प्रदर्शनात वाजे गट बाजार समितीमध्ये सभापती उपसभापती निवडणुकीसाठी दाखल होणार आहे.

तर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थक गटाकडून देखील तालुक्यातील कार्यकर्त्यांची जमवा जमव करण्यात आली असून सर्वजण टप्प्याटप्प्याने वावी वेस भागातील बाजार समितीच्या मुख्यालयाकडे दाखल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT