Somani Garden esakal
नाशिक

नाशिक : सोमानी उद्यान अतिक्रमणमुक्त

सोमानी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या फुटपाथने मोकळा घेतला श्वास

अंबादास शिंदे

नाशिक रोड (जि. नाशिक) : मुक्तिधाम जवळील सोमानी उद्यान परिसराला चारही बाजूने अतिक्रमणाने वेढले होते. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फुटपाथवरील अतिक्रमण हटविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र हे अतिक्रमण पुन्हा जैसे थे होणार व त्याला अभय मिळणार का अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये व येणाऱ्या भाविकांमध्ये सुरू आहे.

महापालिकेकडून उद्यानाचे नूतनीकरण होणार...

मुक्तिधाम जवळ महापालिकेचे (nmc) सोमानी उद्यान असून, कोरोनामुळे हे उद्यान गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. परिणामी उद्यान बंद असले तरी या काळात महापालिकेकडून उद्यानाचे नूतनीकरण करणे आले. पूर्वी मुक्तिधामपासून दत्तमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उद्यानाचे प्रवेशद्वार होते, परंतु आता महापालिकेने सदर प्रवेशद्वार बंद केले आहे. त्या ठिकाणी भिंत टाकली आहे व त्याऐवजी मुख्य प्रवेशद्वार प्रमुख रस्त्यावरून केली आहे.

मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या फुटपाथने मोकळा घेतला श्वास

मुख्य प्रवेशद्वार आता वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होणार आहे. परिणामी आगामी काळात याचा फायदा होईल म्हणून अनेक व्यावसायिकांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या फुटपाथवर आपले बस्तान बांधले. त्यामुळे सोमानी उद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. अतिक्रमण झाल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. अखेर महापालिकेने अतिक्रमण हटविल्याने सध्यातरी सोमानी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या फुटपाथने मोकळा श्वास घेतला आहे.

नगरसेवकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा...

मात्र, हे अतिक्रमण महापालिकेने काढले असले तरी ते कधी उभे राहील याबाबत नागरिकांना चिंता वाटते. सदर अतिक्रमण हटविण्यात यावे म्हणून अनेक वेळा प्रभाग समिती बैठकीत चर्चा झाली. परंतु, अतिक्रमण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. नगरसेवकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने व नवीन आयुक्त रमेश पवार यांनी सूत्र हाती घेतल्याने अतिक्रमण काढण्याबाबत ते वाढू नये म्हणून आयुक्त लक्ष देऊन आहेत. त्यामुळेच सदरचे अतिक्रमण काढले असावे अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT