
नाशिक : उंटवाडी उड्डाणपुलासाठी झाडांचे पुर्नरोपन
नाशिक : महापालिकेकडून अडीचशे कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांसाठी वृक्षांच्या कत्तलीबाबत विषय अजूनही सुटलेला नाही. चारशे झाडांच्या कत्तलीबाबत महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, तर प्रस्तावित उंटवाडी पुलासाठी २४ वृक्षांच्या कत्तलीनंतर त्यातील काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.
मायको सर्कल व उंटवाडी येथे दोन उड्डाणपूल बांधणार...
महापालिका (nmc) मायको सर्कल व उंटवाडी येथे दोन उड्डाणपूल बांधणार आहेत. त्यातील उंटवाडी उड्डाणपुलासाठी २४ झाडांची कत्तल होणार आहे. मात्र, वृक्षांच्या कत्तलीविरोधात नागरिकांचा आक्रोश बघता उंटवाडी भागातील काही झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. दरम्यान, संबंधित बांधकाम कंपनीने एकावेळी दोन्ही उड्डाणपुलाचे काम होणार असल्याने एकावेळी वेगवेगळ्या निविदा निघाल्या. त्यापैकी एका उड्डाणपुलाचे काम करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला महापालिकेने दिल्या आहेत. पण कंत्राटदाराला मात्र एकावेळी दोन्ही कामांच्या सुरवातीची परवानगी हवी आहे.
हेही वाचा: कोट्यवधींची वृक्षलागवड तरीही पारा ४२ अंशावर; जळगाव जिल्ह्याचे चित्र
एकाच वेळी दोन्ही उड्डाणपुलाचे काम होणार...
त्रिमूर्ती चौकापासून होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात ४७५ झाडे येत असल्याने त्याविषयी महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. शासनाकडून अजून याप्रकरणी काही सूचना आलेल्या नाहीत. मात्र उंटवाडी येथील उड्डाणपुलाचे काम निविदा घेतलेल्या कंपनीने सुरू करावे असे महापालिकेने सांगितले आहे. एकाच वेळी आपण दोन्ही उड्डाणपुलाचे काम करू, अशी भूमिका या काम पाहणाऱ्या कंपनीने म्हटले होते. यावर महापालिकेने संबधिताना सूचना दोन्ही उड्डाणपुलांचे कंत्राट एकच नसून भिन्न आहेत. एका उड्डाणपुलाच्या कामासंबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे दोन्हीपैकी उंटवाडी येथील एका उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करावे. काम करताना बांधकामामध्ये जे २४ वृक्ष येत आहेत. यात त्यांचे पुनर्रोपण करावे. काहींची छाटणी करून काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
हेही वाचा: यवतमाळ : तिवसा येथे झाडावर चढून विरुगीरी
Web Title: Replanting Some Trees For Untwadi Flyover In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..