Kapaleshwar Mandir Restoration work  esakal
नाशिक

Kapaleshwar Temple Restoration : श्री कपालेश्‍वर मंदिर जिर्णोद्धार कामास वेग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्‍वर महादेव मंदिराच्या कलशाकडील भागाच्या जिर्णोद्धार कामाने वेग घेतला आहे. मंदिराच्या कलशाच्या बाजूचे दगड निखळल्याने गेल्या काही दिवसांपासून पाणी झिरपत असल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. विश्‍वस्त मंडलेश्वर काळे यांच्या उपस्थितीत या कामाला शुभारंभ झाला. (Sri Kapaleshwar temple restoration work will completed in 6 months Nashik News)

साक्षात भगवान शंकर महादेवांनी लाडक्या नंदीसह वास्तव्य केलेल्या कपालेश्‍वर महादेव मंदिराला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याने दर्शनासाठी बारमाही गर्दी असते. या वर्षी सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे घुमटासह सभागृहात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात झिरपत होते. यामुळे कलशाकडील अनेक दगड निखळले आहेत. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हा भाग धोकादायक बनल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर विश्‍वतांकडून याबाबत विचारविनियम होऊन या कामासाठी निविदा काढण्यात आली. मुंबईस्थित एका अनुभवी कंपनीला हे काम ४० लाख रूपयांत देण्यात आले. संबंधित कंपनीने हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. मात्र याही स्थितीत भाविकांच्या दर्शनात कोणतीही आडकाठी येणार नसल्याचे विश्‍वस्त काळे यांनी सांगितले. या कामाला सुरवात केल्यानंतर विश्‍वस्त, श्री कपालेश्‍वर भक्त मंडळाची बैठकही आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत पावसाळ्यानंतर या कामाला सुरवात करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार विधीवत पूजनानंतर कामाला सुरवात झाली. या वेळी नंदकिशोर मुठे, पद्माकर पाटील, सुनील महंकाळे, सचिन डोंगरे, संतोष मुर्तडक, गणेश बनछोड यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामाला विरोध अनाठायी : काळे

लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्‍वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यापूर्वी सर्वांची बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु, त्या वेळी विरोध न करता काहीजण काम सुरू झाल्यावर विरोध करत आहेत. हा विरोध अनाठायी असून लाखो शिवभक्तांचा अवमान करणारा आहे. त्यामुळे संबंधितांनी विरोध न करता जीर्णोद्धारासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा विश्‍वस्त मंडलेश्‍वर काळे यांनी व्यक्त केली आहे. हे काम वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT