Latest Marathi News | जाखोरीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While pulling out the leopard lying in the well.

Nashik : जाखोरीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

एकलहरे (जि. नाशिक) : जाखोरी शिवारात मंगळवारी (ता. १५) सकाळी बिबट्याची मादी विहिरीत पडल्याने परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. नाशिक तालुक्यातील जाखोरी येथील प्रसाद बोराडे यांच्या मालकीच्या गट नंबर ४८२ शेतातील विहिरीत मादी बिबट्या आढळून आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी पथकाने मंगळवारी सकाळी नागरिकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले. (leopard in well in Jakhori jailed by forest department Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : आता गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी शुल्क पावतीची सक्ती; ठेकेदारांचे धाबे दणाणले

या वेळी नागरिकांनी बिबट्या बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पथकाने नागरिकांच्या मदतीने दोर बांधलेल्या खाटावर बिबट्या आल्यानंतर पिंजरा सोडण्यात आला. वाहनातून बिबट्याला नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेत ठेवण्यात आल्याचे वनरक्षक अनिल अहिरराव यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik Crime : अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक; चौघे फरार

टॅग्स :NashikLeopard