crime
crime esakal
नाशिक

Nashik Crime News : ड्रिंकिंग वॉटरसह स्पिनर बटरचा साठा जप्त; नाशिक शहरामध्ये एफडीएची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासनाने पंचवटीमधील त्रिमूर्ती फूडस अँण्ड बेव्हरेजेस या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर उत्पादन करणाऱ्या पेढीवर धाड टाकली. या ठिकाणी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर एक लिटर बॉटल व पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ५०० मिली वॉटर उत्पादित करीत असल्याचे आढळले.

परंतु त्यांच्या लेबलवर उत्पादनाचे ठिकाण जळगाव असे नमूद केलेले होते. तसेच वेगवेगळे एफएसएसएआय परवाना क्रमांक आढळल्याने अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी सदरचा साठा हा प्रथमदर्शनी मिथ्या छाप व लेबल दोष असल्याने शिल्लक साठा २९१६ लिटर किंमत रुपये ५३ हजार ५३० रुपयाचा जप्त केला.

यावेळी नमुने घेऊन अन्न विश्लेषण प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाने दिली. (Stock of spinner butter along with drinking water seized FDA big action Nashik Crime News)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात वाढ झाल्याने मार्केटमध्ये शीतपेय थंड पदार्थ तसेच पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची मागणी वाढते त्यावर प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून २७ एप्रिल रोजी ही धाड टाकण्यात आली.

तसेच अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सिडकोतील बडदे नगर येथे मसाला स्ट्रोक न्यूट्रिशन या ठिकाणी छापा टाकला.

या ठिकाणी उत्पादित केलेले पीनट बटर (डार्क चॉकलेट) चा नमुना घेऊन त्याचा शिल्लक साठा ७ जार रुपये किंमत रुपये १ हजार ७५० रुपयाचा लेबल दोष, विना परवाना, विना नोंदणी उत्पादन व सदर जागेत उत्पादनासाठी लागणारे कुठले साहित्य नसल्याने भेसळीच्या संशयावरून जप्त केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषण प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.

दोन्ही कारवाई नाशिक विभाग सहआयुक्त सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मनीष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, प्रमोद पाटील व अविनाश दाभाडे यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT