Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik : दुकान फोडणारा संशयित जेरबंद

विनोद बेदरकर

म्हसरूळ (जि. नाशिक) : गंगा घाटावरील कुंकू (Kunku) भांडाराचे दुकान (Shop) फोडणारा संशयित जेरबंद करण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले. संशयिताकडून जवळपास चोरी (Stolen) गेलेल्या मुद्देमालापैकी दहा हजार माल हस्तगत करण्यात आला आहे. (Suspect arrested for shop breaking stolen Nashik crime News)

गंगा घाटावर साई कुंकू भांडाराचे दुकान आहे. बुधवारी (ता. २५) रात्री अज्ञात संशयिताने हे दुकान फोडले होते. दुकानातील तेवीस हजार आठशे रुपयाचा माल चोरी गेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे, निरीक्षक (प्रशासन) रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातील संशयित हा भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली.

गुन्हे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, सुनील शेवाळे, संदीप फुलपगारे, योगेश वाडेकर यांनी सापळा रचून संशयित अन्सार रहीम अत्तार (२८, रा. शनी मंदिराजवळ, मनमाड) यास ताब्यात घेतले. संशयिताची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT