नाशिक

Nashik Crime News : युवकाचा संशयास्पद मृत्यू; खून करून मृतदेह फेकल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जेल रोडला पंचक गावातील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. युवकाची हत्या करून मृतदेह टाकण्यात आल्याचा संशय आहे.

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय ३०), असे मृत युवकाचे नाव आहे. (Suspicious death of youth in jail road nashik road nashik crime news)

ज्ञानेश्‍वर ३ सप्टेंबरला दुपारी मित्रासोबत चाललो, असे सांगून दुचाकीवर गेला. मात्र पुन्हा घरी परत आलेला नव्हता. त्याची पत्नी, वडील व कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दाखल केली.

पोलिस तपास सुरू असतानाच सोमवारी (ता. ११) दुपारी पंचक येथील गोदावरी तीरावर मलनिस्सारण परिसरात उग्र वास येऊ लागल्याने ग्रामस्थांनी नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत फड, अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एक मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे लक्षात आले. मृतदेहाची पाहणी केली असता, छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या. चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले.

मृतदेह सात ते आठ दिवसांपासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता, तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाइकांनी ओळखले.

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत ज्ञानेश्वर गायकवाड हा युवक मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्यामागे वृद्ध वडील, पत्नी आणि एक लहान बाळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT