Temples and palaces attractive to many Goda Ghat preferred for pre wedding shoot esakal
नाशिक

Nashik Pre Wedding Photoshoot: मंदिरे, जुन्या वाड्यांचीही अनेकांना भुरळ! ‘प्री- वेडिंग शूट’साठी गोदाघाटाला मिळतेय पसंती

अलीकडे तरुणांत इतर सर्व गोष्टींसारखाच स्वतःचा लग्न सोहळाही ‘हटके’ करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.

दत्ता जाधव

नाशिक : अलीकडे तरुणांत इतर सर्व गोष्टींसारखाच स्वतःचा लग्न सोहळाही ‘हटके’ करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.

त्यातूनच प्री- वेडिंग शूटिंगला सुगीचे दिवस आले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या लोकेशन्ससाठी लाखो रुपये खर्च करण्याचीही तरुणाईची तयारी आहे.

सध्या गोदाघाटासह विविध मंदिरे, शहरातील जुने वाडे व परिसरातील निसर्गाची तरुणाईला भुरळ पडत आहे. (Temples and palaces attractive to many Goda Ghat preferred for pre wedding shoot)

प्री- वेडिंग शूटिंग व फोटोग्राफी हा अलीकडे तरुणाईच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने गोदाघाटावर सकाळी अशी अनेक जोडपी दृष्टीस पडतात. गोदाघाट, तपोवन, श्री काळारामासह विविध मंदिरे, सोमेश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर आदी ठिकाणांना तरुणाईची अधिक पसंती आहे.

साधारण वीस तीस वर्षांच्या काळानंतर जुनी फॅशन पुन्हा नव्या रूपात येत असते. सत्तर ऐंशीच्या दशकातील नऊवारी साडी, पैठणी, कुर्ता, शेरवानी, ठुशी, पुतळ्याचे गाठले, मोहनमाळ, पेशवाई दागिणे, मोत्याची नथ असे गळाभर सोन्याचे पारंपारिक दागिने यांची क्रेझ पुन्हा आली आहे.

नऊवारी साडी नेसण्यासाठी विशेष कौशल्य लागते, परंतु ही गरज ओळखून अनेक व्यावसायिकांनी रेडिमेड नऊवारी साडी विकसित केली आहे. पेशवाई वस्त्रांसह, उंची सोवळ्यांनाही पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी वाट्टेल तेवढा पैसा मोजण्याचीही तरुणाईची तयारी आहे.

पाच हजार ते काही लाख

तुम्हाला मोजकेच चार दोन फोटो हवे, असतील तर अगदी पाच हजार रुपयांपासून वेडिंग फोटोग्राफी सुरू होते. अर्थात व्हिडिओ शूटिंगसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. हा दर पंचवीस हजारांपासून थेट दोन तीन लाख रुपयांपर्यंतही जातो.

या शूटिंग व फोटोग्राफीसाठी लागणारे कॅमेरेही लाखो रुपयांचे असतात. निरनिराळ्या राज्यात किंवा थेट परदेशात प्री- वेडिंग शूटिंगलाही पसंती दिली जात आहे. अर्थात त्यासाठी खर्च करायचीही तयारी असावी लागते.

प्री वेडिंग शूट किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी प्रामुख्याने सूर्योदय किंवा सुर्यास्ताचा वेळ प्रामुख्याने निवडला जातो.

चांगल्या फोटो किंवा लोकेशनसाठी अलीकडे सुला वाईन, ग्रेप काऊंटीसारख्या ठिकाणांबरोबरच प्राचीन मंदिरे, निसर्ग, नदी आदींच्या सानिध्यात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीला अधिक पसंती दिली जात आहे.

निसर्गसंपन्न राज्यांना पसंती

प्री वेडिंग फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगसाठी देशातील जम्मू-काश्‍मीर, कन्याकुमारीसह, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, गोवा अशा निसर्गसंपन्न राज्यांना पसंती दिली आहे. अनेकांनी यासाठी गोव्यासारख्या समुद्र किनाऱ्यांनाही पसंती दिली आहे.

याशिवाय राज्यातही अनेक ठिकाणे अशा शूटिंग, फोटोग्राफीसाठी नव्याने विकसित झाली आहेत. अनेकांची पसंती निसर्गाच्या सानिध्यातील फोटोग्राफीलाही आहे.

अलीकडे प्री- वेडिंग शूटिंगसाठी राजकीय नेते, सेलिब्रेटी यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगसाठी थेट परदेशातील निसर्गरम्य लोकेशन्सला अधिक पसंती दिली जात आहे.

"फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी एक कला असून तिला मोल नाही. अलीकडील तरुणाईचा कल पारंपारिक वेशभूषेकडे असल्याचे दिसून येते. फोटोग्राफी व व्हिडिओच्या वाढत्या मागणीने या क्षेत्रात काम करणारांना संधी प्राप्त झाली आहे."- विनय शेटे, फोटोग्राफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT