locker.jpg 
नाशिक

'घबाड आलं हाती अन् कर्मानं केली माती'...मग काय चांगलीच झाली फजिती!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सुरगाणा) येथील मेन रोडवरील टपाल कार्यालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीसह दोन लाख पाच हजार 994 रुपयांची रोकड, पोस्टाची शंभर एटीएम कार्डे, रेव्हेन्यू स्टॅम्प नेले. ही घटना बुधवारी (ता. 18) मध्यरात्री घडली. 

अशी आहे घटना

बुधवारी (ता. 18) सकाळी आठच्या सुमारास कर्मचारी मनोहर कनोजे सफाई करण्यासाठी टपाल कार्यालयात गेले असता, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सब पोस्टमास्तर भगवान घुगे, विजयसिंग यादव, पुष्पेंद्र शाह यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना कळविले. तीन-चार वर्षांपूर्वी याच टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता. यातून धडा घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्‍यक असतांना बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या वेळी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान, सकाळनंतर पोलिसांना तिजोरीची माहिती मिळाली. घटनास्थळा पासून एक-दीड किलोमीटरवर कोरड्या ओहोळात तिजोरी मिळून आली. दुपारी या ठिकाणी ठसेतज्ज्ञ तसेच श्‍वान घेऊन आलेले पोलिसपथक दाखल झाले. श्‍वानाने येथून जवळच असलेल्या एका मंदिरापर्यंतच चोरट्याचा माग काढला. त्यापुढे माग काढू शकला नाही. चोरट्याला तिजोरी उघडता आली नाही. त्यामुळे सर्व रक्कम सहीसलामत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे टपाल कार्यालयातील सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहाय्यक निरीक्षक सागर नांद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, हवालदार हेमंत भालेराव, श्री. सहारे आदी तपास करीत आहेत. 

सुरगाणा पोलिस ठाणे नेहमीच चर्चेत

सुरगाणा पोलिस ठाणे नेहमीच चर्चेत असते. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी गुटखा विक्री, मटक्‍याच्या पानटपऱ्या, दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. मात्र, पोलिसांचा आर्थिक लाभ होतो. तेथेच पोलिस जातात का, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

शहरात नेहमीच लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत असून, नगरपंचायतीने चौकात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. - दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT