नळजोडणी नसतांनाही 'पाणीपट्टी'?...'इथं' चाललाय भोंगळ कारभार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

(सिडको) महापालिकेचे पाणीमीटर व पाण्याचा वापर नसतानाही सिडकोतील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला सिडको महापालिका विभागीय कार्यालयाने 19 हजारांचे बिल पाठविले आहे. पाणीपट्टी न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याने पाणीपट्टीधारकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मीटर रीडिंगसाठी कर्मचारी आले असते, तर हा प्रकार घडला नसता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

नाशिक : (सिडको) महापालिकेचे पाणीमीटर व पाण्याचा वापर नसतानाही सिडकोतील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला सिडको महापालिका विभागीय कार्यालयाने 19 हजारांचे बिल पाठविले आहे. पाणीपट्टी न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याने पाणीपट्टीधारकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मीटर रीडिंगसाठी कर्मचारी आले असते, तर हा प्रकार घडला नसता अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

पाणीपट्टी न भरल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही

मार्चएंडमुळे महापालिकेच्या विविध विभागाने थकीत बिलापोटी नोटिसा पाठवण्याचा धडाका लावला आहे. सिडको-अंबड लिंक रोडवरील सिम्बायोसिस महाविद्यालया शेजारी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ही बॅंक आहे. बॅंकेत महापालिकेची नळजोडणी नाही. त्यामुळे पाणी वापरण्याचा संबंध नाही. त्यामुळे पाणीबिलाचा प्रश्‍नच येत नाही. बॅंकेची स्वतःची कूपनलिका असून, त्यातून पाण्याचा वापर होतो. तरीही महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून खातरजमा न करता गेल्या वर्षापासून पाण्याचे बिल भरण्याची नोटीस बजावण्यात येत आहे. पाणीपट्टी न भरल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 2018-19 ची थकीत रक्कम सहा हजार 926 रुपये, तर 2019-20 मध्ये चालू थकबाकी 11 हजार 678 अशी दोन वर्षांची एकूण थकबाकी 19 हजार 604 रुपये दाखविली आहे. 

हेही वाचा > photos : 'दारु पिऊ नको!', असं म्हटल्यावर...राग असा झाला अनावर की लावली आग...

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियात पाणीमीटर नाही. त्यामुळे पाणी वापरण्याचा दूरवर संबंध नाही. तरीही नोटीस बजावली असून, या नोटिशीला बॅंक कायदेशीर उत्तर देईल. - परेश शिंदे, व्यवस्थापक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया. 

हेही वाचा > "शिपिंग इफिशिअन्सी'' घटल्याने 'कांदा' निर्यातदारांना भरली धडकी!

यासंदर्भात माझ्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. नोटीस काढण्याचे काम विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी केले. पाणीमीटर विभाग वेगळा आहे. माझ्याकडे पाणीपुरवठा करण्याचे काम आहे. तरीही शुक्रवारी मी संबंधित जागेवर जाऊन पाहणी करून त्याची शहानिशा करणार आहे. - गोकुळ पगार, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको 

हेही वाचा > #WorldSparrowDay : स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेत वाढतोय 'चिवचिवाट'!

कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता बिल आले कसे काय? यावरून नागरिकांचे येणारे बिल अंदाजे येते हे सिद्ध झाले आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराची चौकशी झाली पाहिजे. याला जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. - मामा ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water bars even when there is no water meter nashik marathi news