esakal | "शिपिंग इफिशिअन्सी'' घटल्याने 'कांदा' निर्यातदारांना भरली धडकी!
sakal

बोलून बातमी शोधा

onion export 1.jpg

कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंधासाठी बंदरातील मनुष्यबळाची कपात वाढविल्याने "शिपिंग इफिशिअन्सी' घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार धास्तावले आहेत. एवढेच नव्हे, तर मलेशियाकडे जाणारे जहाज तीन दिवसांपासून निघालेले नाही, अशी माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. श्रीलंकेत संचारबंदीची चर्चा सुरू झाल्यावर निर्यातदारांनी माहिती घेतली असता, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडण्यात आला. 

"शिपिंग इफिशिअन्सी'' घटल्याने 'कांदा' निर्यातदारांना भरली धडकी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंधासाठी बंदरातील मनुष्यबळाची कपात वाढविल्याने "शिपिंग इफिशिअन्सी' घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार धास्तावले आहेत. एवढेच नव्हे, तर मलेशियाकडे जाणारे जहाज तीन दिवसांपासून निघालेले नाही, अशी माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. श्रीलंकेत संचारबंदीची चर्चा सुरू झाल्यावर निर्यातदारांनी माहिती घेतली असता, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडण्यात आला. 

भारतात "लॉक डाउन' होईल अशी भीती

कांदा निर्यातीचा 15 मार्चचा मुहूर्त जाहीर झाल्यावर पुरेसा वेळ तयारीसाठी निर्यातदारांना मिळाला. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कांदा मोठ्या प्रमाणात विकला जाईल, असा विश्‍वास निर्यातदारांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जगभरात उपाययोजना सुरू आहेत. त्याच वेळी जहाजाने कांदा पाठविल्यावर बंदर बंद केले गेल्यास काय करायचे, असा प्रश्‍न निर्यातदारांपुढे उभा ठाकला आहे. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरल्याने जहाजासाठी पाठविण्यात आलेल्या कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी आयातदारांनी केल्यावर काय करायचे, असा प्रश्‍न निर्यातदारांना भेडसावू लागला आहे. एवढेच नव्हे, तर भारतात "लॉक डाउन' होईल काय, अशी विचारणा आयातदार करत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर हातात असलेली मागणी पूर्ण झाल्यावर पुन्हा कांदा खरेदी न करण्याची भूमिका निर्यातदारांनी स्वीकारली आहे. या साऱ्या वातावरणाचा परिपाक म्हणजे, कांद्याच्या ढासळणाऱ्या भावाची समस्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 

हेही वाचा > #COVID19 : गर्दी नको..अन् नको तो कोरोना! लग्नाच्या गाठी बांधून आटोपला घरगुती विवाह सोहळा 

भाव घसरला 900 रुपयांपर्यंत

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याचा भाव क्विंटलला 900 रुपयांपर्यंत घसरला आहे. गुरुवारी (ता. 19) चांदवडमध्ये 900 रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला. कळवण, लासलगाव, पिंपळगावमध्ये अकराशे रुपये भाव मिळाला. मनमाडमध्ये 913, नामपूरमध्ये एक हजार 250, उमराणेमध्ये बाराशे रुपये क्विंटल असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

राज्यातील क्विंटलचा सरासरी भाव (रुपयांमध्ये) 

औरंगाबाद- एक हजार, धुळे- एक हजार, जळगाव- 900, 
कोल्हापूर- तेराशे, मुंबई- सोळाशे, नागपूर- एक हजार 610, 
पुणे- एक हजार 50, सोलापूर- 900 

हेही वाचा > "शिक्काधारी रुग्णांना सक्तीचे क्वारंटाइन करणार"  

देशांतर्गतचे भाव याप्रमाणे  

अहमदाबाद- चौदाशे, अल्वर- दोन हजार, भुवनेश्‍वर- दोन हजार 350, 
चेन्नई- एक हजार 900, दिल्ली- एक हजार 750, 
कोलकता- एक हजार 813, महुआ- 850, पाटणा- एक हजार 650. 

बाजार समित्या बंद ठेवू नका 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना पणन संचालक सुनील पवार यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी. त्याच वेळी अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाल्या चा पुरवठा सुरळीत होणे आवश्‍यक असल्याने शेतमाल विक्रीमध्ये अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बाजार समित्यांचे मुख्य बाजार, उपबाजार नियमितपणे सुरू ठेवावेत. त्याच वेळी बाजार समित्यांनी बाजार आवार स्वच्छ ठेवावेत. बाजार आवाराची स्वच्छता रात्री अथवा बाजाराची वेळ संपल्यानंतर करण्यात यावीत, असेही श्री. पवार यांनी आदेशात म्हटले आहे.  

हेही वाचा > हुश्‍श... येस बॅंकेतून अखेर मिळाले ३११ कोटी..! 

go to top