leopard attack esakal
नाशिक

Nashik Leopard News : दोन बिबट्यांचा दुचाकीस्वारावर हल्ला; तिघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard News : चांदोरी शिवारातील नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर हल्ला चढविला. यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. (Two leopards attacked bike rider nashik leopard news)

निफाड तालुक्यातील चांदोरी, नागापूर, शिंपी-टाकळी शिवारात बिबट्याचा संचार असून, छत्रपती संभाजीनगर ते नाशिक राज्य मार्गावरून नाशिककडून चांदोरी सुकेणेकडे दुचाकीवरून हर्शल बाळासाहेब चिखले (वय २९), भाची जानवी रानडे (१५) व अनन्या रानडे (१२) जात होते. चांदोरी शिवारात वीज उपकेंद्राजवळील महाराजा हॉटेल येथे राज्य मार्ग ओलांडणाऱ्या दोन बिबट्यांनी त्यांच्यावर झडप घातली व तिघांवर जीवघेणा हल्ला केला.

यात गंभीर जखमी झालेले हर्शल चिखले यांनी सांगितले, की हल्ला झाल्यानंतर दुचाकीवरून जमिनीवर खाली कोसळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डोके, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या. जखमींना तत्काळ चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. याबाबत वन विभागाला सोमवारी (ता. १४) माहिती मिळाली.

दुपारी दोनला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, मनमाडचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांच्यासह निफाडच्या वन विभागाने घटनास्थळी व मौजे सुकेणे येथील चिखले यांच्या वस्तीला भेट देत पंचनामा केला.

हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असून, या घटनेमुळे मौजे सुकेणे, चांदोरी व नागापूर शिवारात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT