Nashik Leopard News : भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पडला विहिरीत; पाहण्यासाठी गर्दी

A leopard lying in a well.
A leopard lying in a well. esakal

Nashik Leopard News : तालुक्यातील उंबरठा वन परिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सीताराम दहावाड यांच्या शेतातील विहिरीत रात्री एक ते दोनच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पडला. रात्री अंधारात मांजरे रानउंदराच्या शिकारीसाठी जंगलात जातात.

मांजराचा पाठलाग करण्याच्या नादात मांजराने विहिरीवरून उडी मारून चकवा दिला असावा. त्यामुळे बिबट्या विहिरीत पडला असेल, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्ष आहे. ( leopard fell into well in search of prey nashik news)

सकाळी काही महिला विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या ही बाब लक्षात आली. विहिरीतील पाईपाचा तग धरून बिबट्याने रात्र काढली असावी. सकाळी काही नागरिकांनी लोखंडी विणलेली खाट उलटी बांधून त्यावर बिबट्याला बसायची व्यवस्था केली.

"पावसाळ्यात सर्वत्र गावालगत दाट झाडी असल्याने रोजच बिबट्या, तरस यांचा वावर असतो. पहाटे व रात्री रस्त्यावर संचार असतो. याचे आम्हाला काही नवल वाटत नाही.

त्यामुळेच आमच्या जल, जंगल, जमीन तसेच निसर्गाचे जतन व संवर्धन होत आहे. वाघदेव, नागदेव, मोर, विंचू, चंद्र, सूर्य आमच्या निसर्ग देवता आहेत. ते आम्हाला पूजनीय आहेत. बिबट्याची सुटका केल्यावर आमच्या भागातील जंगलात त्याला सोडण्यात यावे. दुसरीकडे जंगलात घेऊन जाऊ नये." -नारायण ढाकल, वृक्षप्रेमी, काठीपाडा

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A leopard lying in a well.
Nashik Leopard News: ‘बिबट्या आला रे आला’! अफवा पसरविणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल; वन विभागाचा इशारा

याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, विजय वेलकर, वनरक्षक तुकाराम चौधरी, अरुण मेघा, भटू बागूल, योगेश गांगुर्डे, काशिनाथ बहिरम, भास्कर चव्हाण, वामन पवार, कल्पना पवार, अविनाश छगणे, रामजी कुवर, हिरामण थविल, यमुना बागूल व नाशिक येथील वन्यप्राणी बचाव सहाय्यक पथक आदींनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला दुपारी बाराच्या सुमारास सुरक्षित बाहेर काढले.

उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात त्याला सुरक्षित नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर त्यास वरिष्ठ वन अधिकारी यांच्या सल्ल्याने वन क्षेत्राच्या अधिवासात सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले.

A leopard lying in a well.
Leopard Attack News: मुलगी जंगलात पालकांसोबत चालत असताना अचानक गायब झाली, अखेर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com