vegetables esakal
नाशिक

Nashik : आठवडे बाजारात भाजीपाला मातीमोल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बाजार समितीत स्थानिक ठिकाणहून आवक झालेला मोठ्या प्रमाणावरील भाजीपाला व त्या तुलनेत घटलेली मागणीमुळे बुधवारच्या आठवडे बाजारात सर्वच भाज्या २० ते ३० रुपये किलो दराने उपलब्ध होत्या. गावठी गवार व चंपाषष्ठीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात दाखल झालेली भरताची वांगी मात्र भाव खाऊन गेले. (Vegetables downfall in weekly market Nashik news)

दीपावलीनंतर खवय्यांचा ओढा नॉनव्हेजकडे वाढला असून तो अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. त्यातच थंडीचा कडाका सुरू झाल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. मात्र, पुरवठ्याच्या तुलनेत मागणी घटल्याने मेथी, कोथिंबीर, पालक या पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले. मेथी, कोथिंबीर, पालकाची जुडी अवघ्या पंधरा ते वीस रूपयांत उपलब्ध होती. याशिवाय गिलके, कारली, दोडका, भोपळाही वीस ते तीस रुपये किलोने उपलब्ध होता, भाज्यांना भाव नसल्याने अनेकांनी रात्री उशिरापर्यंत थांबून भाज्यांची विक्री करणे पसंत केले.

येत्या २९ नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे. या दिवशी राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबाला भरत भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. मात्र, चंपाषष्ठीपूर्वीच बाजारात भरताची वांगी विक्रीसाठी आली आहे. बाजारात इतर भाज्यांना मागणी व भाव नसला तरी भरताची वांगी वीस रुपये पावशेर म्हणजे ऐंशी रुपये किलोने तर गावठी गवार शंभर ते एकशेवीस रुपये किलो दराने उपलब्ध होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT