Nashik ZP Recruitment : नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 2 हजार जागांची भरती

zp nashik news
zp nashik newsesakal

नाशिक : ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Recruitment of 2 thousand seats in Nashik Zilla Parishad Nashik News)

zp nashik news
Chhagan Bhujbal | नाशिकमधील सिडको कार्यालय हलविण्याचा हेतू नेमका काय?; भुजबळांचा सवाल

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट ‘क’मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत एकूण दोन हजार ७२६ जागा रिक्त असून, त्यात गट ‘ड’मधील १८८ जागा रिक्त आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती.

zp nashik news
Nashik: पाथर्डीत रंगली वाघ्या- मुरळी पार्ट्यांची जुगलबंदी अन् ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ गजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com