Nashik : रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची व्हावी स्थापना!

Meetings held on Wednesday regarding 'Ram Teertha' at the Satpur office of 'Sakal'
Meetings held on Wednesday regarding 'Ram Teertha' at the Satpur office of 'Sakal'esakal

नाशिक : दक्षिणवाहिनी गोदावरी नदीचे तीर्थक्षेत्रीय माहात्म्य अबाधित राखण्यासोबत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र ‘रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण’ची स्थापना व्हावी, अशी एकमुखी मागणी बुधवारी (ता. १६) येथे करण्यात आली. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, आखाडा परिषद, सनातन वैदिक धर्मसभा, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, गोदाप्रेमी यांच्यातर्फे त्यासंबंधाने महाराष्ट्र अन् केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याचा निर्णय घेण्यात आला. (Ramtirtha Simhastha Kumbh Mela Authority should be established Nashik Latest Marathi News)

Meetings held on Wednesday regarding 'Ram Teertha' at the Satpur office of 'Sakal'
Nashik : पोलिस निरीक्षक कदमांच्या आत्महत्त्येचे गूढ कायम

'सकाळ’च्या सातपूर कार्यालयात झालेल्या बैठकीस ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री भानोसे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तिचरणदास महाराज, धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. भानुदास शौचे, पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, टाकळीच्या श्री मारुती देवस्थानच्या विश्‍वस्त अर्चना रोजेकर, गोदाप्रेमी देवांग जानी, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, चंद्रशेखर क्षीरसागर, राजारामदास महाराज उपस्थित होते.

श्री. भानोसे यांच्या संशोधन, अभ्यासातून पुढे आलेल्या पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, संत वाङ्‍मयीन अन् ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘रामतीर्थ’विषयक ‘रामकुंड नव्हे...रामतीर्थ’ ही वृत्तमालिका ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. अयोध्या, वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ व्हावा, अशी भूमिका ‘सकाळ’ने पुढे ठेवली आहे. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अमृता देवेंद्र फडणवीस, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात सरकार दप्तरी ‘रामतीर्थ’ अशी नोंद घेतली जावी आणि ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ केंद्र सरकारने विकसित करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

याचसंबंधाने लोकप्रतिनिधी, प्रशासन, केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ‘सकाळ’च्या कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये ‘रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन करण्याचा आग्रह धरण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात इतरत्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण कार्यरत असते. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये सिंहस्थासमवेत सदैव गोदावरीसाठी कार्यरत राहणारे प्राधिकरण आवश्‍यक आहे, असे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. पवार, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि नाशिकमधील आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. फरांदे, सौ. हिरे यांना निवेदन देण्याचे उपस्थितांनी ठरविले.

Meetings held on Wednesday regarding 'Ram Teertha' at the Satpur office of 'Sakal'
Nashik ZP Recruitment : नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 2 हजार जागांची भरती

पुरोहित संघाच्या प्रमुख मागण्या

० तीर्थक्षेत्री ‘रामतीर्थ’ भागात पुरोहितांसाठी साडेतीनशे स्वतंत्र कक्षाची करावी उभारणी.

० गंगा गोदावरीच्या संरक्षणासह तीर्थक्षेत्राचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी आखावी योजना.० यात्रेकरूंसाठी निवासाची आणि प्रसादालयाची व्हावी व्यवस्था.

० ‘रामतीर्थ’ परिसरातील प्रश्‍नांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पुरोहित संघ प्रतिनिधींची करावी संयुक्त समिती.

"गंगा ही गोदावरीची छोटी बहीण मानली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमा, ज्‍येष्‍ठ शुद्ध पौर्णिमा व सिंहस्‍थ कुंभमेळ्यात गंगा मोठ्या बहिणीच्या भेटीसाठी येत असते. त् ‍यादिवशी गंगेची पूजा होते. पूर्वी आठवडा बाजाराच्या दिवशी बुधवारी ‘रामतीर्थ’ स्वच्छ केले जात होते. ही व्यवस्था आता पुन्हा सुरू करावी लागेल. त्याचबरोबर गोदावरी सुरक्षारक्षक सदैव तैनात ठेवावे लागतील. गोदावरीच्या महाआरतीसाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू व्हावी." -सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

"‘सकाळ’ने ‘रामतीर्थ’चा दस्तऐवज जगभरातील भाविकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे विशेष आभार मानण्यात येत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर ‘सकाळ’ने दाखविलेली दिशा उपयुक्त ठरणारी आहे."

-वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, अध्यक्ष, सनातन वैदिक धर्मसभा

"पुरोहितांकडे असलेला नामावळरूपी दस्तऐवज भाविकांना आपल्या पूर्वजांची माहिती मिळण्यासोबत सरकारी कामकाजासाठी उपयुक्त आहे. त्याचा उपयोग व्यवहारात यायला हवा. त्यादृष्टीने नामवळींकडे पाहिले जावे. मुळातच, गोदावरी ही भक्ती आणि मुक्तीचे तीर्थस्थान असल्याने तिच्या स्नानातून भाविकांना समाधान मिळावे, अशी व्यवस्था करायला हवी."

-स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री भानोसे, प्राचार्य, ज्ञानविज्ञान महाविद्यालय

"गोदावरी मातेसाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्‍यकता आहे. तसेच प्रत्येक तीर्थासंबंधीची माहिती आताच्या आणि पुढील पिढीपर्यंत पोचण्यासाठी स्वतंत्र पुस्तिका करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे."

-महंत भक्तिचरणदास महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, आखाडा परिषद

"गोदावरीचे पावित्र्य टिकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आग्रही असायला हवे. त्याच वेळी यजमान (भाविक) यांच्यासाठी सुविधा उपलब्ध होण्याची आवश्‍यकता आहे. ‘रामतीर्थ’चा उल्लेख सरकार दप्तरी व्हावा, ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ विकसित व्हावा, ‘रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल."

-ॲड. भानुदास शौचे, शहराध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ

"नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची नोंद युनेस्कोमध्ये झाली आहे. त्यामुळे ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ विकसित होताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होणे आवश्‍यक आहे. गोदावरी सदैव वाहती राहण्यासाठी काँक्रिटीकरण नष्ट करून झरे जिवंत करावे लागतील. ‘रामतीर्थ’ भागातील कुंडातील पाण्याचा ‘बीओडी’ साडेचार मिलिग्रॅम असल्याचे चाचणीतून पुढे आले आहे. हीच स्थिती आपणाला संपूर्ण गोदावरीची करणे शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी लागेल."

-देवांग जानी, गोदाप्रेमी

"समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्य राहिलेल्या टाकळी येथील नंदिनी नदीची दुरवस्था झाली आहे. या नदीचे वैभव पुन्हा प्राप्त व्हावे. त्याचबरोबर गोदावरीमध्ये संगम होणाऱ्या आणि नाशिकमधील इतर नद्यांचे पुनरुज्जीवन करून नाशिकच्या नावलौकिकात भर घातली जावी."

-अर्चना रोजेकर, विश्‍वस्त, टाकळीचे श्री मारुती देवस्थान

"स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेली कामे गोदावरीचे महत्त्व वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने नाशिककरांशी संवादाची भूमिका यंत्रणेने घ्यायला हवी. पुरोहितांसाठी स्वतंत्र कक्षाच्या मागणीचा विचार व्हायला हवा."

-चंद्रशेखर पंचाक्षरी, कार्याध्यक्ष, पुरोहित संघ

Meetings held on Wednesday regarding 'Ram Teertha' at the Satpur office of 'Sakal'
Nashik News : कलावंतांनी साधला ‘एकदम कडक’ संवाद; 2 डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com