A team of forest department while seizing a vehicle with khair wood in Umbarthan forest area. esakal
नाशिक

Nashik Crime News : उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडासह वाहन जप्त; वनविभागाची कारवाई

खैर प्रजातीचे चोवीस नग जी.जे.१५, सी ९४८४ या टाटा सफारी गाडीमध्ये अवैध पणे वाहतूक करतांना आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : वनपरिक्षेत्र उंबरठाण अंतर्गत रघतविहीर या जंगलात पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान वनविभागाचे पथक गस्तीवर असतांना खैर प्रजातीचे चोवीस नग जी.जे.१५, सी ९४८४ या टाटा सफारी गाडीमध्ये अवैध पणे वाहतूक करतांना आढळून आले.

वनविभागाने पाठलाग करुन गाडी अडवली असता खैर लाकुड आढळून आले. (Vehicle seized with khair wood in Umbarthan forest area by forest department nashik crime news)

वनविभागाने खैर लाकडासह वाहन जप्त करून ताब्यात घेतले असून वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी पंचनामा केला असता वाहनांसह तीन लाख अकरा हजार एकशे एकोण सतर रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी, सहायक वनरक्षक उमेश वाघ, उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ई. टि. भले, बी. आर. चव्हाण, वनरक्षक ए. डी. छगणे, वाय. व्ही. बहिरम, व्ही. डी. पवार, एम. एम. देशमुख, वनमजूर कामडी, राजाराम चौधरी, जाहुल चौधरी, भगरे, शांताराम गावित, अरुण पवार, अभी चौधरी यांनी कारवाई केली.

चालक व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. वनविभागाने कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT