ZP Nashik  esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषद लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्राची होणार पडताळणी

महाराष्ट्र राज्य परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांनी सादर केलेल्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : सातारा जिल्हा परिषदेतील लिपिकांनी सादर केलेली टंकलेखन प्रमाणपत्र बोगस असल्याची निर्दशनास आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांनी सादर केलेल्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. यातून बोगस प्रमाणपत्रधारक पुढे येण्याची शक्यता आहे. ()

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्यावतीने गत अनेक वर्षांपासून टंकलेखनाचा अभ्यासक्रम टंकलेखन संस्थांच्या मार्फत शिकविण्यात येत असून टंकलेखनाची इंग्रजी, मराठी व हिंदी माध्यमातील ३० व ४० शब्द प्रति मिनीट वेगाच्या परीक्षा देखील आयोजित करण्यात येते.

जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडील इंग्रजी ३० व ४० शब्द प्रति मिनीट तसेच मराठी ३० व ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखन प्रमाणपत्राच्या आधारे मोठया प्रमाणपत्रावर लिपिकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

काही लिपिकांची तर या प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती देखील झालेली आहे. तथापि या लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी आमच्या कार्यालयाकडून करवून घेतलेली नसल्यामुळे, काही जिल्ह्यांमध्ये बोगस प्रमाणपत्र आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे घेण्यात आला निर्णय

सातारा जिल्हा परिषदेतर्फे प्रती प्रमाणपत्र ५०० रुपये प्रमाणे आवश्यक पडताळणी शुल्क भरून, प्रथम पदोन्नतीच्या टप्पावर असलेले, व नंतर सर्व कार्यरत असलेले लिपिक असे दोन टप्यात, त्यांच्याकडील सर्वच लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता एकूण या कार्यालयास प्राप्त झालेल्या १४८ टंकलेखन प्रमाणपत्रांपैकी ३० टंकलेखन प्रमाणपत्र संबंधित लिपिकांनी बोगस सादर केल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे इतरही जिल्हा परिषदेत अशी प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कनिष्ठ तसेच वरिष्ठ लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची आवश्यक पडताळणी केली जाणार आहे.

अशी करता येणार पडताळणी

टंकलेखक प्रमाणपत्रधारकांनी शुल्क भरुन पडताळणी करुन घेतल्यास बोगस प्रमाणपत्रांना आळा बसू शकेल. याकरिता कार्यालयाच्या mscegectbe@gmail.com या ई-मेल अॅड्रेसवर आपण सर्व संबंधित लिपिकांची नावे व त्यांनी दाखल केलेल्या मुळ टंकलेखन प्रमाणपत्रांच्या प्रती स्कॅन करुन आवश्यक पडताळणी शुल्कासह (प्रति प्रमाणपत्र रु. ५००/-) पाठविल्यास तत्काळ पडताळणी करून दिली जाणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याबाबतचे परिक्षा परिषदेचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेले नसले सांगण्यात येत आहे.

बोगस प्रमाणपत्रधारक निघण्याची शक्यता

सातारा जिल्हा परिषदेप्रमाणे नाशिक जिल्हा परिषदेत देखील बोगस टंकलेखन प्रमाणपत्र धारक निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील एका बंद पडलेल्या संस्थेचे टंकलेखन प्रमाणपत्र अनेक लिपिकांनी सादर करून पदस्थापना, पदोन्नत्या घेतलेल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पडताळणीतून नेमके किती लिपीकांकडे बोगस प्रमाणपत्र निघते याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT