Voter list esakal
नाशिक

Nashik News : मतदारांची 20 हजार दुबार नावे वगळली; मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची २० हजार दुबार नावे जिल्हा निवडणूक शाखेने यादीतून वगळली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची २० हजार दुबार नावे जिल्हा निवडणूक शाखेने यादीतून वगळली आहेत. येत्या सोमवारी (ता.२२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. (voter list will be published on Monday nashik news)

यंदाच्या मतदार यादीला लोकसभा निवडणुकीची किनार असल्यामुळे तिला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगूल फेब्रुवारीत वाजण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुर्नरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या नाव व पत्त्यात दुरुस्ती केली जात आहे.

याशिवाय मतदार यादीतून दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याची प्रक्रीया राबविली जात आहे. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संभाव्य दुबार नावे शोधण्यात येत आहेत. त्यासाठी दोन टप्प्यात तपासणी केली. प्रथमत: कुटुंबातील सदस्य व पत्त्याचा तपशील तसेच समान छायाचित्रे व नावे असलेल्या नोंदींचा यात समावेश आहे.

सॉफ्टवेअरद्वारे अशी संदिग्धता असलेल्या ५४ हजार नावांची पडताळणी केली गेली. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत आतापर्यंत २० हजारांच्या आसपास दुबार नावे सापडली. प्रशासनाकडून ही सर्व नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

मतदार यादीत नाव नोंदणी करा

मतदार यादीत नावनोंदणीची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी यादीत नाव समाविष्ट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपयुक्त आहे.

निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे. यादीतील नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो.

मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.‌ तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरील https://play.google.com/store/apps/details0id=com.eci.citizen 012q34567या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT