nashik esakal
नाशिक

महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना नोटीस

विनोद बेदरकर

नाशिक : महिला तलाठ्याकडे (talathi) शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार असलेल्या येवला प्रांताधिकारीला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे या प्रकरणी अडचणी वाढणार आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रांताधिकाऱ्याकडून खुलासा मागविला आहे.

महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती

येथील प्रांताधिकारीने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिला तलाठ्याने केला होता. गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर एका महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. बदलीस पात्र नसतानाही ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली यांसह विनयभंगाचे त्यांच्यावर आरोप करून बदलीविरोधात पीडित महिला तलाठ्याने मॅटमध्ये धाव घेतली होती. २३ ऑगस्टपर्यंत मॅटने स्थगिती दिली. दरम्यान, त्या महिलेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केली होती. येवला पोलिस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी विशाखा समितीकडून याविषयी अहवाल मागविला. त्यानंतर विशाखा समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी; कारणे दाखवा नोटीस

महिला तलाठ्याकडे (talathi) शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार असलेल्या येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांना जिल्हा प्रशासनाने कारवाई का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे कासार यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. प्रातांधिकारी कासार यांच्याविरोधात महिला तलाठ्यांनी केलेल्या तक्रारीत विशाखा समितीने ठपका ठेवला असून, त्यांच्यावर कारवाईसाठी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कासार यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT