Arun Jadhav
Arun Jadhav esakal
नाशिक

Nashik News : ...अन् ट्रिप ठरली जीवघेणी; पाथर्डी फाटा येथील तरुणाचा वैतरणा धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वैतरणा धरणावर आपल्या मित्रांसमवेत सहलीसाठी गेलेल्या नाशिक येथील अरुण जगदीश जाधव ( वय २० ) रा. पाथर्डी फाटा नाशिक येथील तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मयत झाल्याने घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (young man from Pathardi Phata drowned death in Vaitarna Dam Nashik News)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथून गुरु गोविंद इंजिनियर कॉलेजचे दहा विद्यार्थी वैतरणा धरण येथे मुक्कामी सहलीसाठी आले होते. शुक्रवारी ( ता. ५ ) रोजी सायंकाळी टेन्ट ( कापडी छोटे खाणी घर ) करून मुक्कामी राहिले.

शनिवार ( ता.६ ) रोजी सकाळी यातील काही मित्र घरी जायचे म्हणुन वैतरणा धरणाच्या पाण्यात उतरून अंघोळीला गेले होते. यातील जगदीश जाधव यास पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याने इतर पोहता येणाऱ्या मित्रांनी व परिसरातील नागरिकांच्या मददतीने त्याला पाण्याबाहेर काढून घोटी येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी भरती केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत झाल्याची घोषणा केली. आपल्या समवेत आलेला मित्र आपल्याला सोडून गेल्याने इतर मित्र देखील भेदारलेल्या अवस्थेत होते. यामुळे सहल अथवा ज्या परिसराची माहिती नसलेल्या ठिकाणी जातांना गाईडची व्यवस्था न केल्याने आपल्यातील मित्र या उच्च सुशिक्षित युवकांनी गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वैतरणा धरण परीक्षेत्रात विनापरवानगी सहल अथवा पाण्यात उतरून मौजमज्या करणाऱ्या युवकांना वेळेवर सुरक्षा रक्षक नसल्याने आपला जीव गमवावा लागला. वैतरणा धरणावरील अनेक सिसिटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन मौजमजा करत असतांना सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष यावरून वैतरणा धरणाची सुरक्षा देखील भविष्यात धोक्यात आली आहे. यावर जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष केंद्रित करून धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.

या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बिपीन जगताप हे करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT