youth was killed by his friends dispute over bursting firecrackers nashik crime news 
नाशिक

Nashik Crime News: फटाके फोडण्याच्या वादातून मित्रांनीच केला युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: फटाके फोडण्यावरुन झालेल्‍या वादात मित्रांनीच युवकाचा खून केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला. (youth was killed by his friends dispute over bursting firecrackers nashik crime news)

पाथर्डी गाव परिसरात मंगळवारी (ता.१४) रात्री दहाच्‍या सुमारास घडलेल्‍या या घटनेत मृत युवकाचे नाव गौरव तुकाराम आखाडे (वय ३१) असे आहे. दरम्‍यान या घटनेमुळे पाथर्डीगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पाथर्डीगाव परिसरातील स्वराज्य नगर या भागात (ता.१४) रात्री दहाच्‍या सुमारास इमारतीखाली गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) हा फटाके फोडत होता.

याच परिसरात राहणाऱ्या त्‍याच्‍या मित्रांनी या कारणावरुन वाद घालत कोयत्याने गौरववर वार केले.

गंभीर जखमी झाल्याने गौरवचा मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. मृत गौरव यांच्‍या पत्नी सपना आखाडे यांच्‍या फिर्यादीवरुन गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांकडून केलेल्‍या या कृत्याबाबत संताप व्‍यक्‍त केला जातआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT