Nashik Crime News : खळबळजनक! सशस्त्र दरोडेखोंराच्या हल्ल्यात 8 जण गंभीर जखमी

8 people seriously injured in attack of armed robbers nashik crime news
8 people seriously injured in attack of armed robbers nashik crime newsesakal

Nashik Crime News : येथील कटके वस्ती परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने एकाच रात्री दरोडा टाकून आठ जणांना जबर मारहाण करून जखमी केले. या दरोड्यात लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लुटन्यात आली.

शनिवार, ता. २१ च्या मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा पडला. दरोडेखोरांनी महिलांना देखील जबर मारहाण केली आहे. (8 people seriously injured in attack of armed robbers nashik crime news)

याबाबत जखमी व्यक्तींनी दिलेली माहिती अशी की, कटकेवाडी परिसरात कमोदकर वस्तीवर मध्यरात्री बाराच्या सुमारास वीस ते पंचवीस वयोगटातील सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी दत्तू कमोदकर यांच्या वस्तीवर प्रथम मद्य प्राशन केले. दत्तू कमोदकर यांच्या परिवारास मारहाण करून दागिने व पैशाची मागणी केली.

तेथे काहीच हाती न लागल्यामुळे दरोडेखोरांनी तेथून काही अंतरावर असलेल्या बबन कमोदकर यांच्या घरी हल्ला चढविला. घराबाहेर झोपलेल्या बबन कमोदकर यांच्याकडे घरातील दागिने व पैशाची मागणी केली. मात्र कमोदकर यांनी आरडाओरड सुरू केल्याने दरोडेखोरांनी त्यांना धारदार शस्त्र व लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली.

घरात झोपलेला मुलगा अनिल व महिलांना धमकावले. धारदार शस्त्राने वार केले. अनिल कमोदकर यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना डोक्यात सळईचा घाव घालून जबर जखमी केले. मस्तकावर टोला बसल्याने ते खाली कोसळले. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलांच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून तेथून दरोडेखोर पळून गेले.

8 people seriously injured in attack of armed robbers nashik crime news
Nashik Crime News : ‘नशेडी’ म्हणून हिणवल्यानेच ‘त्याने’ केली आत्महत्या; मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल

तेथून एक किमी अंतरावर असलेल्या राजकुमार शुक्ला यांच्या शेतातील वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढविला. बाहेर झोपलेल्या शुक्ला यांना धमकावून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. सुरुवातीला शुक्ला यांनी दरवाजा उघडून देण्यास प्रतिकार केला असता त्यांना धारदार शस्त्र व लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली.

त्यांचा आरडाओरडा ऐकून घरात झोपलेल्या महिला व मुलगा विकास यांनी दरवाजा उघडला. दरोडेखोरानी घरात प्रवेश करून मुलगा विकास यास जबर मारहाण केली. घरातील कपाट, सुटकेस, बँगा यांची तोडफोड करून सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने, बावीस हजार रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे.

या घटनेमुळे येवला तालुक्यात दहशतीचे वातावरण झाले आहे. येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. अद्याप पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही.

8 people seriously injured in attack of armed robbers nashik crime news
Nashik Crime News : वडाळी नजीकच्या ‘त्या’ युवकाचा खूनच! खुनाच्या घटनेने वडाळी नजीक हादरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com