ZP Nashik esakal
नाशिक

ZP fund expenditure meet : निधी नियोजन बैठकीत विभागप्रमुखांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निधी खर्चासंबंधित बोलाविलेल्या बैठकीत विभागप्रमुखांकडे झालेल्या निधी खर्चाचा तपशील नसल्याचे समोर आले. त्यावर मित्तल यांनी विभागप्रमुखांना थेट माहिती घेऊन बैठकीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. या प्रकारावरून मित्तल यांनी विभागप्रमुखांची झाडाझडतीही घेतल्या. दरम्यान, निधी २०२२ या आर्थिक वर्षातील निधी खर्चासाठी जानेवारी २०२३ चा अल्टिमेटम यावेळी मित्तल यांनी विभागप्रमुखांना दिला. (ZP Fund Expenditure Meet Heads of departments clashed in fund planning meeting Nashik news)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २९) निधी खर्च आढावा बैठक झाली. बैठकीस अनेक विभागप्रमुख वेळेत उपस्थित नसल्याने मित्तल यांनी नाराजी व्यक्त केली. बैठक सुरू झाल्यानंतर विभागप्रमुख बैठकीस दाखल झाले. बैठकीत प्रत्येक विभागास आतापर्यंत झालेला खर्चाची माहिती मित्तल यांनी विचारली. मात्र, अनेक विभागप्रमुखांकडे आपल्याच विभागात प्राप्त झालेला निधी व झालेला खर्च, टक्केवारी यांची माहिती नव्हती. त्यावर मित्तल चांगल्याच संतापल्या. त्यांनी माहिती नसणाऱ्या विभागप्रमुखांना माहिती घेऊन बैठकीस हजर राहण्याचे फर्मान काढले. त्यांनतर विभागप्रमुखांनी धावपळ करत माहिती गोळा करत बैठकीस उपस्थिती लावली.

प्रत्येक विभागात झालेल्या खर्चाचा मित्तल यांनी सविस्तर आढावा घेतला. यात बांधकामासह काही विभागाचा खर्च कमी असल्याचे दिसून आले. त्यावर, मित्तल यांनी संबंधित विभागांना विचारणा देखील केली. प्राप्त झालेला निधी वेळात खर्च होणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना मित्तल यांनी देत जानेवारी २०२३ अखेर २०२१-२२ या आर्थिक वर्षातील निधी खर्च झाला पाहिजे, असे नियोजन करण्याचे सांगितले. निधी अखर्चिक राहता कामा नये अशी ताकीदही त्यांनी विभागप्रमुखांना या वेळी दिली. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नियोजनासदेखील सुरवात करावी. नियोजन करून त्यास मान्यता द्यावी, कार्यारंभ आदेश द्यावे अशा, सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT