उत्तर महाराष्ट्र

नाथाभाऊ, फडणवीसांचे आता जुळलं; आले एकाच गाडीतून (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

जळगाव- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर नाराज आहेत. ही त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. अनेक वेळा खडसेंनी आपल्या मनातली ही नाराजी बोलून दाखवली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खडसेंना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा पासून त्यांची नाराजी आहे. सोमवारी खुद्द त्यांच्याच बालेकिल्ल्यात कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्रीही त्याला उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे एकाच गाडीतून कार्यक्रमाला आल्यानं कार्यक्रमापेक्षा जास्त चर्चा रंगली ती त्यांच्या एकत्र येण्याची.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल (ता.08) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकित माजी मंत्री खडसे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली त्यानंतर जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनीच त्याबाबत खुलासा करीत सांगितले, खडसे यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते येवू शकले नाहीत. मात्र दुपारी नाटयगृहाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी खडसे उपस्थित होते,त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खडसे यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर नाट्यगृहाचे फित कापतांना खडसे मागे राहिले. ही बाब लक्षात येताच फडणवीस फित न कापता थांबले त्यांनी "नाथाभाऊ पुढे या' अस म्हणत त्यांना पुढे बोलावून घेतले. त्यांना सोबत घेतले. त्यानंतरच फित कापली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT