four way highway fagne tarsod
four way highway fagne tarsod 
उत्तर महाराष्ट्र

फागणे-तरसोद चौपदरीकरणाचे काम लागणार मार्गी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मक्तेदार एजन्सीने या कामाला गती देण्याच्या दृष्टीने आठवडाभरात यंत्रणा उभारण्याचे निश्‍चित केले असून, या टप्प्यात तीन ठिकाणी बांधकामाचे "प्लॅंट' उभारण्यात येणार आहेत. 
अनेक वर्षांपासून प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला दोन-तीन वर्षांपूर्वी सुरवात झाली. धुळे व जळगाव जिल्ह्यातील एका टप्प्यातील काम फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यात विभागून दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. याद्वारे दोन स्वतंत्र मक्तेदार एजन्सींना हे काम देण्यात आले. 

फागणे-तरसोद काम रखडले 
या दोन्ही कामांना खरेतर एकाचवेळी मंजुरी मिळाली, कार्यादेश देण्यात आले. मात्र, एकीकडे तरसोद- चिखली टप्प्याचे काम वेगात होत असताना दोन वर्षांपासून फागणे ते तरसोद या टप्प्यातील काम रखडले होते. मक्तेदार एजन्सी एमबीएल ऍग्रोला दरम्यानच्या काळात निधीची अडचण आल्याने काम ठप्प झाले. 

काम मार्गी लागणार 
माध्यम व लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता हे काम आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून हे काम अगदीच संथगतीने सुरू होते. एक-दोन ठिकाणी दहा- पंधरा कामगार या साइटवर दिसत होते. आता मात्र या 87 किलोमीटरच्या टप्प्यातील कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी मुकटी, पारोळा- एरंडोलदरम्यान व मुसळी- पाळधी टप्प्यात असे तीन बांधकामाचे प्लॅंट कार्यान्वित करण्यात येतील. युद्धपातळीवर काम सुरू झाल्यानंतर ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

दुरुस्तीही तातडीने होणार 
चौपदरीकरणाचे काम ठप्प असताना सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे या महामार्गाचीही दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या महामार्गावर सर्वाधिक खराब टप्पा असलेल्या पाळधी ते एकलग्न व पुढे मुसळी- एरंडोलपर्यंतच्या मार्गाची दुरुस्ती त्वरित तीन पथकांच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT