उत्तर महाराष्ट्र

विकास पॅकेजिंगमधून निर्यातीचे नवे दालन खुले  - प्रतापराव पवार

सकाळवृत्तसेवा

नाशिक  - जागतिक बाजारपेठेत उत्पादनांमध्ये आकर्षक, दर्जेदार प्रिंटिंग- पॅकेजिंगचे वाढते महत्त्व ओळखून "सकाळ'च्या विकास प्रिंटिंग अँड कॅरिअर्सने या आघाडीवर अल्पकाळात भरारी घेतली आहे. नाशिकमधून जागतिक दर्जाची सेवा दिली जाणे, ही अभिमानाची बाब असून, आगामी काळात निर्यातीचे नवे क्षितिज खुले होईल, असा विश्‍वास "सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी (ता. 19) येथे व्यक्‍त केला. 

विकास प्रिंटिंग अँड करिअर्समधील विस्तारित पॅकेजिंग युनिटच्या दुसऱ्या टप्प्यातील बॉब्स्ट डायकटर मशिनचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. "सकाळ' माध्यम समूहाचे संचालक जयदीप माने, छपाई तंत्रातील तज्ज्ञ शिरीष सहस्रबुद्धे, "विकास'चे उपाध्यक्ष यशवंत पाठक व संदीप खुटाडे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, की "विकास'चे नाशिक युनिट जागतिक दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीने समृद्ध झाले आहे. त्यामुळे अल्पावधीत देशाच्या, तसेच काही अन्य देशांमधूनही दर्जेदार छपाईची कामे केली जाऊ लागली आहेत. या माध्यमातून निर्यातीचे व परकीय चलन मिळविण्याचे नवे दालन खुले होण्यास मदत होईल. 

तत्पूर्वी, मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीमधून विस्तार करण्यात आलेल्या "विकास'च्या नव्या यंत्रसामग्रीची श्री. पवार व अन्य मान्यवरांनी पाहणी केली. "सकाळ'चे संचालक जयदीप माने यांनी मार्केटिंग टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

"विकास'चे उपाध्यक्ष खुटाडे म्हणाले, की पॅकेजिंग क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर "विकास'ने अवघ्या दोन वर्षांत जवळपास एक लाख चौरस फुटांपर्यंतचा बांधकाम विस्तार केला. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवंलब करताना बॉब्स्ट, हेडल बर्ग, केबीए या अत्याधुनिक कंपन्यांची यंत्रे बसविण्यात आली. यामुळे अल्पदरात जागतिक दर्जाची पॅकेजिंगची सेवा नाशिकच्या बाहेर कोलकता, अहमदाबाद, चेन्नई आदी शहरांमधील विविध कंपन्यांना देणे "विकास'ला शक्‍य झाले आहे. "विकास'चे वरिष्ठ व्यवस्थापक आशिष शेटे, चंद्रशेखर परदेशी, व्यवस्थापक अमोल लोकरे, कुणाल दुसाने, सपना जोशी, आदिती सोनवणे, सुनील पाटील, सौ. लता शेटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT