rigorous imrpisonment news esakal
उत्तर महाराष्ट्र

प्रवाशास लुटणाऱ्याला सश्रम कारावास; सलीम वड्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर पाच वर्षांपूर्वी इंदूरच्या प्रवाशाला लुटणाऱ्या गुन्हेगार वसीम वड्याला न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे चाळीसगाव रोड पोलिसांनी या गुन्ह्यातील मुद्देमाल शंभर टक्के रिकव्हर केला. जलदगती तपास करीत चार दिवसांत दोषारोपपत्रही जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. (Rigorous imprisonment to Salim Vada for robbing passengers 2 lakh worth goods seized Dhule Crime Latest Marathi News)

इंदूर येथील शब्बीर हुसेन हैदर अली कप्तान यांना १८ मार्च २०१८ ला मध्यरात्री चाळीसगाव रोड चौफुलीवर वसीम सलीम रंगारी ऊर्फ वसीम वड्या (रा शब्बीर नगर, दोन हजार प्लॉट, धुळे) याने लुटले. त्यांच्याकडील ब्रेसलेट, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, इयरिंग, गोल्ड कॉइन, लेडीज मनगटी घड्याळ व आयटीएस स्मार्ट कार्ड, असा एकूण एक लाख ९७ हजार किमतीचा मुद्देमाल लुटून नेला.

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक सागर आहेर यांनी तपास चक्र फिरवत हवालदार प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशील शेंडे व सोमनाथ चौरे आदींनी काही तासातच आरोपी निष्पन्न करीत गुन्ह्याचा छडा लावला. वसीम वड्या यास ताब्यात घेत गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर केला.

न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकील राकेश चौधरी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी वसीम वड्या यास एक वर्ष सश्रम कारावास आणि हजार रुपये दंड, तो न भरल्यास दोन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT