Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नासाठी पुन्हा बिऱ्हाड आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-3, वर्ग-4 कर्मचारी संघर्ष संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला असल्याने सकाळपासून जुना आग्रा महामार्गावरील आदिवासी विकास भवन परीसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र दुपारी दीडच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदान परीसरात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या ठरत आंदोलन केले.
आंदोलनाच्या पार्श्‍वभुमिवर आदिवासी विकास भवन परीसरात सकाळपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात केलेला होता. कार्यालयात येणाऱ्या व्यक्‍तींची चौकशी करून आत सोडले जात होते. या दरम्यान आंदोलनासाठी आलेल्या काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले. दुपारी दीडच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व आंदोलक एकवटले. मैदानात नेण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची मनधरणी केली परंतु, त्यांना यश आले नाही. अखेर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत चर्चेची मागणी करतांना तात्काळ निर्णय घेण्याची भुमिका घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आदिवासी विकास विभागाचे उपायुक्‍त प्रदीप पोळ यांना आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी रितेश ठाकूर यांनी आपल्या मागण्यांविषयी सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात आयुक्‍तांशी चर्चा करुन त्यानंतर ठोस निर्णय घेणार असल्याचे श्री. पोळ यांनी सांगितले. पदयात्रा काढत आदिवासी विकास भवनला जाण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मात्र वाहतुकीला अडथळा ठरणार असल्याचे कारण देत पोलिसांनी परवानगी दिली नाही. अखेर आंदोलनकर्त्यांपैकी काहींना वाहनातून आदिवासी विकास भवनला नेण्यात आले.

अशा आहेत मागण्या:
ज्यांचा अनुभव पदवीधर प्राथमिक व प्राथमिक शिक्षक असून त्यांना अनुभव गुदान करावे. व तोपर्यंत निवड प्रक्रियेला स्थगिती द्यावी. प्राथथमकची प्रतिक्षा यादी जाहिर करावी. महिला अधिक्षकांच्या भरती प्रक्रियेत रोजंदारी महिला अधिक्षिकांना त्यांचा समायोजन होतांना दिसत नसल्याने भरती तात्काळ स्थगित करावी. मध्यवर्ती भोजनगृह सुरू केल्यामुळे दहा ते पंधरा वर्षे काम करणाऱ्या वर्ग 4 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले असून त्यांना पुन्हा कामावर घेऊन कायम सेवेत समायोजन करावे. जुन्या अनुभवी रोजंदारी कर्मचाऱ्यांना डावलून सुरू केलेली नवीन रोजंदारी भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT